breast cancer treatment saam tv
लाईफस्टाईल

Cancer Treatment: साईड-इफेक्टशिवाय कॅन्सर ट्यूमर होणार नष्ट; ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी गेम चेंजर ठरणार IIT चं संशोधन

Breast Cancer : आता आयआयटी मद्रासच्या शास्त्रज्ञांनी स्तनाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी औषधं देण्याची एक नवीन प्रणाली विकसित केलीये. जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कॅन्सरचा नाश करू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. जगभरातील महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर हा मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. दरम्यान यवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचे गंभीर दुष्परिणाम ते एखाद्या व्यक्तीसाठी आव्हानात्मक बनवतात. मात्र आता आयआयटी मद्रासच्या शास्त्रज्ञांनी स्तनाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी औषधं देण्याची एक नवीन प्रणाली विकसित केलीये. जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कॅन्सरचा नाश करू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी त्यांनी त्याचं पेटंटही मिळवलंय.

अधिकाऱ्यांच्या मते, संशोधकांनी 'नॅनोमटेरियल्स'च्या गुणधर्मांचा फायदा घेऊन कॅन्सरच्या पेशींना कॅन्सरविरोधी औषधं पोहोचवू शकणार्‍या औषध डिलीवरी सिस्टमला डिझाइन केलं आहे. हे नवं इनोवेशन जुन्या उपचार पद्धतीला एक सुरक्षित आणि अधिक प्रभावी पर्याय देतं.

संस्थेच्या अप्लाइड मेकॅनिक्स आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक स्वाती सुधाकर यांनी सांगितलं की, नॅनोकॅरियर्स बायो कम्पेटीबल आहेत. कॅन्सर नसलेल्या किंवा निरोगी पेशींसाठी हे विषारी नाही. म्हणूनच, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरप्यूटिक औषधांसारख्या उपचारांसाठी ते एक चांगला पर्याय आहे. जे केवळ कॅन्सरच्या पेशींवरच काम करत नाहीत तर निरोगी पेशींवर देखील परिणाम करतात ज्यामुळे केस गळणं, मळमळ, थकवा इत्यादी गंभीर नुकसान होतं.

सुधाकर पुढे म्हणाल्या की, औषधाचे वारंवार डोस घेतल्याने कॅन्सरच्या पेशी केमोथेरपीटिक औषधांना प्रतिकारशक्ती देखील विकसित करू शकतात. ज्यामुळे शेवटी उपचारांचा प्रभाव कमी होतो. प्रयोगशाळेत स्तनाच्या कॅन्सरच्या पेशींवर अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये असं दिसून आलंय की, औषधांनी भरलेल्या नॅनोआर्किओसोम्सने कॅन्सरच्या पेशींमध्ये पेशी संपवण्यास सुरुवात झाली आणि केमोथेरप्यूटिक औषधांच्या अगदी कमी डोसमध्ये ट्यूमरची वाढ प्रभावीपणे रोखली गेली.

आयआयटी मद्रास आणि शिक्षण मंत्रालयाच्या निधीतून मिळालेलं संशोधन निष्कर्ष रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने प्रकाशित केलेल्या मटेरियल्स अॅडव्हान्सेस आणि नॅनोस्केल अॅडव्हान्सेस यासारख्या प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित कऱण्यात आलं आहे. या संशोधनासाठी गेल्या महिन्यात भारतीय पेटंट मंजूर करण्यात आल्याची देखील माहिती आहे.

संशोधक सुधाकर यांच्या सांगण्यानुसार, कॅन्सर उपचार पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगण्याचं प्रमाण सुधारण्यासाठी आणि जगभरातील रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी हे संशोधन आशेचं किरण ठरणार आहे. आमचं पुढचं पाऊल म्हणजे प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये या औषधाचा प्रभाव तपासणं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT