Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Nashik News : नाशिकमध्ये फटाका दुकानाचा परवाना मिळवून देतो सांगून व्यावसायिकाची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शिंदेसेनेचा कार्यकर्ता आणि अग्निशमन दलातून निवृत्त अधिकारी अटकेत असून पोलिस तपास सुरू आहे.
Fraud Case Nashik
Nashik NewsSaam Tv
Published On
Summary

नाशिकमध्ये फटाका शॉप परवाना मिळवून देतो सांगत व्यावसायिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक

आरोपींमध्ये शिंदेसेनेचा कार्यकर्ता आणि निवृत्त अधिकारी अटकेत

राजकीय ओळख सांगून आणि खोटी आश्वासने देत केली पैशांची उकळी

पोलिस तपास सुरू असून प्रकरणाने नाशिक व्यापारी वर्तुळात खळबळ

Nashik News: नाशिकमधून धक्कदायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला फटाका शॉप सुरू करण्यासाठी लागणारा परवाना मिळवून देतो सांगून १३ लाख रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. धक्कदायक म्हणजे व्यावसायिकाची फसवणूक करणारी व्यक्ती शिंदेसेनेचा कार्यकर्ता असून दुसरा आरोपी हा अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील व्यावसायिक सारंग चांदे यांना फटाका शॉप सुरू करण्यासाठी शासकीय आस्थापनांकडून ना हरकत दाखल्यांसह परवाना पाहिजे होता. यासाठी त्यांनी ओळखीचे तौसिफ यांच्याशी संपर्क साधला. तौसिफ याने तांबे यांची ओळख मोगल यांच्यासोबत करून दिली. मोगल यांनी त्यांना विविध राजकीय नेते, तसेच विद्यमान मंत्री यांची ओळख सांगून त्यांच्यासोबत काढलेली विविध छायाचित्रे दाखवली.

Fraud Case Nashik
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

त्यांनतर परवाना मिळून देतो, असे सांगत विश्वासात घेऊन विविध कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाखाली तांबे यांच्याकडून रक्कम उकळली. तांबे यांनी मोगल, शेख याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आता फक्त पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे शिल्लक असल्याचे सांगून आणखी काही रकमेची मागणी करत अजून १ लाखाची खंडणी उकळली.

Fraud Case Nashik
Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

फसवणूक झाल्याचे समजताच तांबे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित आरोपी शिंदेसेनेचा कार्यकर्ता संशयित सचिन रमेश मोगल, अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले संशयित आरोपी तौसिफ इब्राहिम शेख यांना अटक केली आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com