Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. आज दिवाळी लक्ष्मीपूजन हा सण आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्याने घरात सुख- समृद्धी आणि आनंद येते.
मेष राशींच्या व्यक्तींनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धणे, साखर, तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. तसेच आज लाल वस्त्र, तांब्याचे भांडे दान केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
वृषभ राशीसाठी लक्ष्मी पूजनामध्ये कमळाचे फूल, काळे तील, कमळाच्या बिया वापरणे शुभ असते.
लक्ष्मीपूजनात मिथुन राशीच्या लोकांनी धूर, मध, गूळ, धणे यांचा वापर करा. बुधवारी रिकामे भांडे पाण्यात बुडवल्याने समृद्धी येते पैशांची तंगी दूर होते.
सिंह राशीच्या लोकांना महालक्ष्मीला तांदळाचे तुकडे, लाल फुले अर्पण केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.
तूळ राशीच्या लोकांनी अन्न गायीला तसेच अग्नीला अर्पण करावे. देवी लक्ष्मीला, धने, कमळाची बिये अर्पण करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.