Bone cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Early signs of bone cancer: सतत हाडं दुखणं, सूज, रात्री वाढणाऱ्या वेदना आणि किरकोळ दुखापतीत हाड मोडणं ही बोन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दुर्लक्षित न करता वेळेत डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

वय वाढल्यानंतर किंवा जास्त शारीरिक श्रमाची काम केल्यानंतर हाडं दुखणं ही अनेकांची सामान्य तक्रार असते. अनेकजण अशा वेदनांकडे वाढतं वय, संधिवात किंवा जुनी दुखापत असेल असं समजून दुर्लक्ष करतात. पण काही वेळा सतत होणारं हाडांचं दुखणं हे बोन कॅन्सरचंही सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

ऑर्थो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निखिल टंडन यांच्या मते, बोन कॅन्सर हा दुर्मिळ आजार असल्यामुळे लोकांच्या मनात त्याचा विचारही येत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित करतात आणि आजाराचं निदान उशिरा होतं.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेक रुग्ण वेदना किंवा सूज वाढून चालणं-फिरणं किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होईपर्यंत डॉक्टरांकडे जात नाहीत. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 4 हजार नवीन बोन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. जगभरातील एकूण कॅन्सरच्या रुग्णांमध्ये बोन कॅन्सरचं प्रमाण सुमारे 5 टक्के आहे.

बोन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती?

बोन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं इतर हाडांच्या आजारांसारखीच असल्यामुळे अनेकदा रूग्णांचा गोंधळ होतो. त्यामुळे खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

  • एखाद्या एका हाडामध्ये वारंवार होणाऱ्या वेदना

  • सांध्याजवळ सूज येणं

  • हात-पाय किंवा सांध्यांची हालचाल कमी होणं

  • किरकोळ दुखापतीनंतर हाड मोडणं

डॉ. टंडन यांच्या म्हणण्यानुसार, बोन कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना कालांतराने अधिक तीव्र होतात. विशेषतः रात्री त्या जास्त जाणवतात. विश्रांती घेतल्यानंतर किंवा पेनकिलर औषधं घेतल्यानंतरही वेदना कमी होत नाहीत. तरीही अनेकजण स्वतःच औषधं घेत राहतात किंवा वेदना आपोआप कमी होतील, अशी वाट पाहतात.

बोन कॅन्सरचं लवकर निदान कसं होतं?

जीवनशैलीत बदल करून बोन कॅन्सर पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास आजाराची लक्षणं वेळेत ओळखता येऊ शकतात.

  • कोणतेही स्पष्ट कारण नसताना हाडांचं दुखणं अनेक आठवडे कायम राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  • स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत होणारं दुखणं किंवा सूज असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करा आवश्यक असल्यास एक्स-रे किंवा इतर तपासण्या करून घ्याव्यात.

  • इंटरनेटवरील माहितीवर किंवा अंदाजावर अवलंबून राहू नये.

  • नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर केलेल्या चाचण्यांमुळे शरीरातील बदल लवकर लक्षात येऊ शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

SCROLL FOR NEXT