Surabhi Jayashree Jagdish
आजकाल फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले अन्न खाण्याचं प्रमाण वाढलंय. याशिवाय दिवसभर बसून काम करणं आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे रक्तातील LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
अनुवंशिकता हेही वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. मधुमेह, हायपोथायरॉईडीझम आणि किडनीचे काही आजार यांमुळेही कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. वाढतं वय आणि रजोनिवृत्तीनंतर काही महिलांमध्येही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका अधिक असतो.
उच्च कोलेस्ट्रॉलला अनेकदा सायलेंट समस्या म्हटलं जातं. कारण सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करणं गरजेचं आहे.
रक्तातील LDL कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते. त्यामुळे हार्ट अटॅक झटका, स्ट्रोक यांचा धोका वाढतो. ही समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यास जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.
उच्च कोलेस्ट्रॉलला अनेकदा सायलेंट समस्या म्हटलं जातं. कारण सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करणं गरजेचं आहे.
डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा त्यांच्या आसपास पिवळसर, मऊ गाठी दिसू शकतात, ज्यांना झॅन्थेलॅझ्मा म्हणतात. या गाठी काही लोकांमध्ये वाढलेल्या कोलेस्ट्रॉलशी संबंधित असू शकतात.
डोळ्यांच्या काळ्या बुबुळाभोवती पांढऱ्या किंवा करड्या रंगाचे वर्तुळ दिसणं ज्याला कॉर्नियल आर्कस (Corneal Arcus) म्हणतात. ही समस्या वयोमानानुसारही होऊ शकते.
अत्यंत जास्त कोलेस्ट्रॉल किंवा इतर रक्तातील चरबी वाढल्यास डोळ्यांच्या रेटिनामधील रक्तवाहिन्यांमध्ये काही बदल तपासणीत दिसू शकतात. हे बदल सामान्य व्यक्तीला आरशात सहज दिसत नाहीत, परंतु डोळ्यांच्या तपासणीत त्याचं निदान होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.