Surabhi Jayashree Jagdish
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल मोठ्या प्रमाणात कमी झालीये. दीर्घकाळ बसून काम करणं आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. बैठ्या जीवनशैलीमुळे रक्ताभिसरण आणि हृदयाचं कार्य प्रभावित होऊ शकतं.
फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त तेलकट-गोड अन्न खाल्ल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात.
कामाचा ताण, अपुरी झोप आणि मानसिक तणाव यांचा थेट परिणाम हृदयावर होतो. याशिवाय धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन रक्तवाहिन्यांचं नुकसान करतं व रक्तदाब वाढवू शकतं. त्यामुळे कमी वयातही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढताना दिसतंय.
हाताची पकड पूर्वीपेक्षा कमकुवत वाटणं हे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित संकेत असू शकतं. काही संशोधनांमध्ये कमी ग्रिप स्ट्रेंथचा संबंध खराब हार्ट अटॅकच्या जोखमीशी जोडला गेला आहे.
हात सपाट ठेवून फक्त अनामिका वर उचलताना अडचण येत असेल तर त्यामागे मधुमेह, स्नायूंचा ताठरपणा यांसारखीही कारणं असू शकतात. मात्र हे लक्षण हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आजारांकडेही इशारा करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बोटांच्या टोकांचा आकार फुगल्यासारखा दिसणं आणि नखं खाली वाकल्यासारखी होणं याला क्लबिंग म्हणतात. हे काही वेळा हृदय किंवा फुफ्फुसांच्या गंभीर आजारांशी संबंधित असू शकतं. अशी लक्षणं दिसल्यास स्वतः निष्कर्ष न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
नखांचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलून ती पांढरी किंवा ढगाळ दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे रक्ताभिसरणातील समस्या किंवा काही हृदयाशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. असे बदल दिसल्यास तपासणी करणं महत्त्वाचं आहे.