Blood Sugar Level Saam tv
लाईफस्टाईल

High blood sugar: रक्तातील साखरेची पातळी 370 mg/dL पेक्षा जास्त म्हणजे रेड अलर्ट, उशीर करणं जीवावर बेतेल

High blood sugar 370 mgdL danger: डायबेटीस रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर रक्तातील साखर 370 mg/dL पेक्षा जास्त झाली तर ती गंभीर स्थिती मानली जाते आणि तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका वयानंतर प्रत्येकाने त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासून पाहिलं पाहिजे. जर तुमची ब्लड शुगर लेवल 370 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या मते हा गंभीर इशारा मानला जातो. इतक्या जास्त प्रमाणातील ब्लड शुगर लेवल म्हणजे तुमचा मधुमेह नियंत्रणात नसल्याचे संकेत आहेत. ही परिस्थिती तुमच्या जीवावरही बेतू शकते.

यामुळे पुढे स्ट्रोक, डायबेटिक किटोअॅसिडोसिस (DKA) यांसारखी गंभीर स्थिती उद्भवू शकते. जास्त थकवा आणि मळमळ अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

एका वेबसाईटला माहिती देताना दिल्लीतील इंटरनल मेडिसिन विभागाचे लीड कन्सल्टंट डॉ. नरेंद्र सिंगला यांनी सांगितलं की, जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल 250 mg/dL पेक्षा जास्त असल्यास हायपरग्लायसेमिया निर्माण होऊ शकतो. अशावेळी आपत्कालीन उपचारांची गरज लागू शकते. तर ही पातळी 300 mg/dL पेक्षा जास्त असली तर डायबेटिक किटोअॅसिडोसिसची समस्याही निर्माण होऊ शकते. यामुळे हृदयाच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

रक्तातील साखर वाढण्यामागची कारणं

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अधिकचा ताणतणाव, औषधं वेळेवर न घेणं, इन्फेक्शन होणं किंवा अयोग्य आहार ही त्यामागची सामान्य कारणं असतात. फक्त औषधांनी रक्तातील ब्लड शुगर काही प्रमाणात नियंत्रणात राहते. मात्र पण दीर्घकाळ नियंत्रण हवं असल्यास निरोगी सवयी आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे.

ब्लड शुगर खूपच वाढली तर काय करावं?

अचानक तुमच्या शरीरात ब्लड शुगरचं प्रमाण जास्त झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भरपूर पाणी प्यायल्याने लघवीद्वारे जास्तीची ग्लुकोज बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे लघवीतील किटोन्स तपासण्यासाठी युरिन किटोन टेस्ट करणं महत्त्वाचं आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर ब्लड शुगर लेवल 370 mg/dL पेक्षा जास्तच राहिली तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्या. अशावेळी इन्सुलिन किंवा औषधांचे डोस बदलावे लागू शकतात. तसंच खूप तहान लागणं, वारंवार लघवी होणं, दृष्टी धूसर होणं किंवा पोटात वेदना होणं अशी लक्षणे दिसल्यास उशीर न करता डॉक्टरांची मदत घ्यावी, असं डॉ. सिंगला यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

Maharashtra Live News Update: पुसदमध्ये उभ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग

Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

Shocking News: कारमध्ये आढळले १ महिला अन् २ पुरूषांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? दिल्लीत खळबळ

Paneer Ghotala Recipe : सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी बनवा पनीर घोटाळा, पोषण मिळेल अन् वेळही वाचेल

SCROLL FOR NEXT