Monsoon Car Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Car Tips : पावसाळ्यात अचानक तुमची बाईक-कार अडकली तर, कशी वाचवाल ? जाणून घ्या या खास टिप्स

Car Care Tips : हल्ली दर वर्षी पावसाळ्यात वाहने पाण्यात अडकण्याच्या आणि वाहून गेल्याच्या घटना घडतातच.

कोमल दामुद्रे

Monsoon Car Driving Safety : पावसाळा आला की रस्त्यांचे अगदी नदीत रुपांतर होते. त्यातही सलग दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस लागला की आपल्या आसपासच्या परिसरात पाणी साठण्याची समस्या दर पावसाळ्यात जाणवतेच. अशात ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांचे मात्र दर पावसाळ्यात नुकसान होतेच.

हल्ली दर वर्षी पावसाळ्यात (Monsoon) वाहने पाण्यात अडकण्याच्या आणि वाहून गेल्याच्या घटना घडतातच. त्यात पाण्यात अडकलेली बाईक (Bike) किंवा कार पाहून अनेकजण घाबरून जातात. या वेळी काय करावे हे बऱ्याच जणांना सुचत नाही. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पाण्यात अडकलेल्या गाडीतून कसे बाहेर पडावे या संबंधित काही खास टिप्स सांगणार आहोत .

गाडी पाण्यात अडकल्यास काय करावे?

1. पॅनिक न होता समजूतदारपणे परिस्थिती हाताळावी.

पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही आणि आपली गाडी पाण्यात अडकते. अशा परिस्थितीत तुम्हाला पाण्यातून बाहेर कसे निघता येईल या विचाराने भीती वाटू शकते, पण आपण पॅनिक न होता, परिस्थिती समजूतदारपणे हातळली पाहिजे. अशा परिस्थितीत घाबरल्यामुळे अनेकदा चुका होऊ शकतात व याच चुकांमुळे परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता असते.

2. गाडीचे इंजिन लगेच बंद करावे.

गाडीची चाके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यास लगेच गाडी बंद करावी. असे न केल्यास गाडीचे एग्जॉस्ट बंद होऊन इलेक्ट्रीकल कंपोनंट्सचे नुकसान होऊ शकते.

3. हँड ब्रेकचा वापर करावा

हँड ब्रेक लावल्याने आपली गाडी गिअरमध्ये आहे की, नाही हे तपासणे आवश्यक असते. हँड ब्रेक लावल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यास गाडीला पलटण्यापासून रोखण्यास मदत होते.

4. बॅट्ररीला डिसकनेक्ट करणे

गाडी पाण्यात अडकल्यास गाडीतील सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी बंद कराव्यात. आपल्या गाडीच्या बॅट्ररीला लगेच डिसकनेक्ट केल्याने शॉर्ट सर्किट किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिकल नुकसान होण्याच्या शक्यतेस रोखते. जेव्हा तुम्ही आपल्या गाडीला पाण्यातून बाहेर काढाल तेव्हा तिची सर्व्हिसिंग करायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

Hardeek Joshi-Akshaya Deodhar : राणादा अन् पाठकबाईंनी दिली गुडन्यूज, घरात आला नवा सदस्य

ऐन दिवाळीत नागपुरमध्ये अग्नितांडव, जिओ मार्केटसह १० ठिकाणी आगीचा भडका; पाहा VIDEO

Pune News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात राडा, सारसबागमध्ये दोन गट भिडले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT