Daily Routine Saam Tv
लाईफस्टाईल

Daily Routine : हेल्दी लाँग लाईफ हवी असेल तर फॉलो करा 'या' टिप्स, माईंड आणि स्वभाव राहील शांत !

हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईंडसाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही आहे.

कोमल दामुद्रे

Daily Routine : तुमची हेल्दी बॉडी तुम्हाला दीर्घायुष्य देते यात काही शंकाच नाही. हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईंडसाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही आहे.

तुम्हाला तुमच्या अंगी काही चांगल्या सवयी लावून घ्यावे लागतील. आज आम्ही तुम्हाला चांगले जीवन जगण्याच्या काही चांगल्या सवयी सांगणार आहोत. जेणेकरून आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल.

1. पूर्वतयारी करा :

  • तुम्हाला तुमच्या सकाळची सुरुवात शांततेत आणि चांगल्या प्रकारची करायची असेल तर, रात्रीच तुम्ही सकाळी काय करणार आहात याच नियोजन करा.

  • जेणेकरून सकाळी उठल्यावर आता काय करावे याचा विचार तुम्हाला करावा लागणार नाही. तुम्ही एक रात्र आधी सकाळी जे कपडे घालून जाणार आहात.

  • ते कपडे बाहेर काढून ठेवा. त्याचबरोबर तुम्ही सकाळी जी बॅग नेणार आहात ती आवरून ठेवा.

  • असं केल्याने सकाळची तुमच्या दिवसाची सुरुवात शांततेत होईल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुमची धावपळ देखील होणार नाही.

2. लिखाण सुरू करा :

  • अनेक लोक त्यांच्या अनेक प्रकारच्या सकाळच्या दिनचर्याला विसरून जातात.

  • जसं की, सकाळी उठून औषध (Medicine) खाण्याचे विसरणे, किंवा सकाळी उठून पाणी प्यायचे विसरणे.

  • अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी अनेक लोक विसरतात. त्यामुळे तुम्ही रात्रीचं या सगळ्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी एका कागदावर लिहून ठेवा.

  • आणि तो कागदाच्या ठिकाणी लावा जेणेकरून तुमची नजर त्याच्याकडे पटकन जाईल. असं केल्याने तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमधील गोष्टी विसरणार नाही.

  • त्याचबरोबर संपूर्ण सुरळीत चालल्याने तुमच्या अंगामध्ये पॉझिटिव्हिटी संचारेल.

Daily Routine

3. अलार्म सारखा सारखा बंद करू नये :

  • सकाळी सकाळी उठणे अतिशय कठीण असते.

  • अशातच थंडीच्या दिवसांमध्ये उठणे हा एक टास्क बनून जातो. परंतु तुमची सकाळी हेल्दी आणि शांततेत जावी म्हणून तुम्ही वेळेच्या दहा मिनिटात आधीच उठा.

  • असं करण्यासाठी अलार्म सेट करत असाल तर, त्याला वारंवार बंद करू नका.

  • उठल्यानंतर तुमची बॉडी स्ट्रेच करा. त्याचबरोबर थोडासा व्यायाम देखील करा.

  • असं केल्याने तुम्हाला झोप येणार नाही आणि तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी होईल.

4. पौष्टिक नाश्ता करा :

  • तुम्हाला तुमची दिनचर्या हेल्दी घालवायचे असेल तर तुम्ही नियमित सकाळचा नाष्टा केला पाहिजे.

  • अशातच थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक सकाळच्या वेळी अनहेल्दी फूड (Food) खातात. तसं न करता तुम्ही हेल्दी फूडचे सेवन करा.

5. दररोजच्या दिनचर्यामध्ये मेडिटेशनसुद्धा करा :

  • मेडिटेशन केल्याने आपले शरीर शांत आणि हेल्दी राहते. मेडिटेशन केल्याने तुम्ही कोणते निर्णय शांतपणे आणि योग्यरीत्या घेऊ शकता.

  • त्याचबरोबर सकाळची सुरुवात मेडिटेशनने केल्याने तुमचे स्वास्थ्य चांगले राहते.

  • त्याचबरोबर तुम्हाला कोणताही ताणतणाव असेल तर तो दूर निघून जातो.

Daily Routine

6. व्यायाम करणे आहे आवश्यक :

  • दररोज सकाळी उठल्यावर पंधरा ते वीस मिनिटे नियमित व्यायाम केला पाहिजे.

  • जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये गुड केमिकल तयार होते.

  • दररोजच्या व्यायामामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि ऍक्टिव्ह राहते.

  • त्यामुळे सकाळच्या दरम्यान चालायला किंवा जिमला जा.

  • तुम्ही व्यायामासाठी पंधरा ते वीस मिनिटे काढू शकत नसेल तर, दहा मिनिटे योगा केला तरी चालेल.

7. बॉडी आणि माईंडसाठी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे :

  • स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या बॉडी आणि माईंडला अतिशय फायदेशीर (Benefits) असते.

  • तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही बेसिक स्ट्रेचिंग करा.

  • स्ट्रेचिंग करण्याआधी तुम्ही तुमच्या वॉर्मअप रुटीनला फॉलो करा.

8. गाणी (Song) करतील स्ट्रेस दूर :

  • तुम्ही कामासाठी बाहेर जात असता किंवा घरातून काम करत असाल तर, तुमचे माईंड रिलॅक्स राहण्यासाठी तुम्ही सॉंग थेरेपी घेऊ शकता.

  • गाणे ऐकल्याने तुमच्या शरीरामधील सगळा थकवा दूर निघून जाईल. म्हणून तुमच्या सॉंग प्ले लिस्टमध्ये तुमच्या आवडीची गाणी डाऊनलोड करून ठेवा आणि गरज पडल्यावर ती सतत ऐका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोनसाखळी चोरी प्रकरणातील इराणी टोळीतील आरोपीला अटक

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये, पाहा डोळे दिपवणारे फोटो

Swelling Issues : सकाळी हात पाय सुन्न पडतात? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Jannat Zubair And Elvish Yadav: फैजलनंतर जन्नत झुबेर करते एल्विश यादवला डेट? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT