Health  Saam Tv
लाईफस्टाईल

तुम्ही शारीरिक संबंध ठेवणचं बंद केलं तर? हे होतील आरोग्याला धोके

शारीरिक संबंधांकडे पाहण्याची आपली दृष्टी थोडी वेगळी असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शारीरिक संबंधांकडे पाहण्याची आपली दृष्टी थोडी वेगळी असते. केवळ शारीरिक सुख मिळण्यासाठी नव्हे तर जोडीदाराबरोबर चांगले शारीरिक संबंध (sex ) आवश्यक असतात असे देखील नाही. तर शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक (Family) स्वास्थ्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध चांगले असायला हवे. स्त्री-पुरुषाच्या नात्यामध्ये मानसिक किंवा भावनिक जवळीक जास्त महत्त्वाची असते. की शारीरिक संबंध महत्त्वाचे या मुद्द्यावर कायम वाद होत असताना दिसतात. पण या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या देखील आहेत.

हे देखील पहा-

सेक्स आणि बरंच काही..

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक संबंधांमध्ये योग्यरितीने समतोल असणे आवश्यक आहे. कामाचे वाढते तास, थकवा, सोशल मीडियाचा (Social media) अतिवापर यांचा संबंधांवर परिणाम होत असताना दिसून येतो. पण आपले एकूण वैयक्तिक, मानसिक, भावनिक आणि पर्यायाने सामाजिक जीवन चांगले राहावे असे वाटत असल्यास जोडीदारावर प्रेम (Love), माया आणि शीरीरिक संबंध चांगले असणे खूप गरजेचे आहे. यामुळे शारीरिक संबंधांमध्ये समतोल असणे आवश्यक असते. शारीरिक संबंधांमुळे ऑक्सिटोसिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनची निर्मिती होत असते. या हॉर्मोनमुळे आपल्याला मानसिक समाधान आणि पर्यायाने मानसिक शांती मिळण्यास मदत होत असते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. उदासिनता, नैराश्य कमी होऊन आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढत असते.

शारीरिक संबंध मानसिक आरोग्याविषयी शारीरिक आरोग्यासाठी (health) देखील खूप फायदेशीर असते. शारीरिक संबंधांमुळे एकप्रकारचा व्यायाम होत असतो. मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर शारीरिक संबंधांमुळे रक्ताभिसरण सुधारत असते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होत असते. रक्तदाब कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, त्वचा उजळ होणे हे देखील फायदे दिसून येत असतात. असे असले तरी शारीरिक संबंध हे सुरक्षितच असायला हवेत अन्यथा त्यामधून उद्भवणाऱ्या अडचणी या जोडप्यांना आणि कुटुंबियांना त्रासदायक ठरत असतात. आता शारीरिक संबंधांची वारंवारीता काय असावी असा देखील प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. तर साधारणपणे 40 वयाच्या आत जोडप्यांमध्ये आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा शारीरिक संबंध येणे, 40 नंतर आठवड्यातून किमान 1 वेळा आणि वयाच्या 60 नंतर 2 आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध असायला हरकत नाही. मात्र, याचे प्रमाण व्यक्तींनुसार बदलत असतात, पण त्याचा समतोल साधणे आवश्यक आहे.

नात्यातल्या सुखाचे फायदे

- उत्तम शारीरिक संबंध असतील तर आपल्यात नकळत सकारात्मकता आणि आत्मविश्वास येत असतो.

-मानसिकरित्या शांत आणि आनंदी राहण्याकरिता शारीरिक संबंध चांगले असणे खूप गरजेचे असते.

-विविध गोष्टींचा आपल्याला असणारा ताण कमी करण्यासाठी शारीरिक संबंध उपयुक्त ठरत असते.

-उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी तसेच व्यायाम म्हणून देखील शारीरिक संबंध महत्त्वाचे ठरत असते.

-घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यासाठी देखील जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध चांगले असणे खूप आवश्यक असते.

-सर्वात महत्त्वाचे वंश वाढविण्याची म्हणजेच मूल होण्याची गोष्ट शारीरिक संबंधांशिवाय होऊ शकत नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: आयपीएलची पहिली बोली १८ कोटींची! स्टार गोलंदाजावर लागली सर्वात मोठी बोली

Diljit Dosanjh Concert: गायक दिलजीत दोसांझचा पुण्यात म्युझिक कॉन्सर्ट, चंद्रकांत पाटील यांचा विरोध; कारण काय?

Vinod Nikole News : पालघर डहाणूवर पुन्हा फडकला लाल झेंडा, सीपीएमचे विनोद निकोले पुन्हा झाले आमदार

Aheri Election result 2024 : अहेरीत बाप विरूद्ध मुलगी लढत, धर्मरावबाबा अत्राम यांनी केला मुलीचा पराभव

Virat Kohli Century: शतकांचा दुष्काळ संपला! 'विराट' शतकासह किंग कोहलीने रचला इतिहास; डॉन ब्रॅडमनला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT