Health Tips saam tv
लाईफस्टाईल

Health Tips: लघवीमध्ये 'हे' बदल दिसल्यास समजा किडनी होतेय खराब; अजिबात दुर्लक्ष करू नका

Health Tips: किडनीमध्ये काही समस्या असल्यास या टाकाऊ पदार्थांना फिल्टर करण्यात अडचण येते. किडनी निकामी होण्यापूर्वी लघवीमध्ये तुम्हाला काही संकेत दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी आपल्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. किडनी आपल्या शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं काम करतं. मात्र यावेळी किडनीमध्ये काही समस्या असल्यास या टाकाऊ पदार्थांना फिल्टर करण्यात अडचण येते. यावेळी किडनीला होणारा रक्तपुरवठा थांबतो आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकतं.

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात नको असलेले घातक पदार्थ जमा होऊ शकतात. यावेळी शरीरात अनेक विपरीत बदल दिसून येतात. किडनी निकामी होण्यापूर्वी लघवीमध्ये तुम्हाला काही संकेत दिसून येतात. हे संकेत नेमके काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

लघवीदरम्यान जळजळ

जर तुम्ही लघवीदरम्यान किंवा जळजळ जाणवत असेल, तर ते किडनीच्या इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला या तक्रारीचा सामना करावा लागत असेल तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची मदत घ्या.

लघवीचा रंग बदलणं

लघवीच्या रंगात बदल झाल्याचं लक्षात आल्यास वेळीच सावध व्हा. लघवीचा रंग लाल किंवा हलका गुलाबी असेल तर किडनी इन्फेक्शन, किडनी फेल्युअर आणि ब्लॅडर इन्फेक्शनची शक्यता असण्याचा धोका असतो.

लघवीदरम्यान फेस येणं

लघवी करताना काही प्रमाणात फेस दिसल्यास हे प्रोटीन्युरियाचं लक्षण मानलं जातं. या लक्षणांवरून तुमची किडनी निकामी होत असल्याचं समजावं. यावेळी तुम्ही डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.

लघवीतून रक्त येणं

लघवीतून जर सातत्याने रक्तस्राव होत असेल तर हे किडनीच्या इन्फेक्शनचं कारण मानलं जातं. जर लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसला तर ते गंभीर लक्षण असण्याची शक्यता आहे.

लघवीला दुर्गंध येत असेल

जर लघवीला नेहमीपेक्षा जास्त तीव्र दुर्गंध येत असेल तर ते किडनीच्या संसर्गाचे लक्षण असू शकतं. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांची नक्कीच मदत घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag : ठरलं तर मग! पूर्णा आजीची धमाकेदार एन्ट्री, कोण साकारणार भूमिका?

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Maharashtra Police Action : तळीरामांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी दारू प्याल तर घडेल अद्दल, नेमकं काय प्रकरण ?

Dhanteras Marathi Wishes: सोन्यासारख्या शुभेच्छा! धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास मेसेजेस

EPFO New Rule: EPFO च्या नियमात मोठा बदल! पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT