Heart attack face symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Signs: चेहऱ्यावर 'ही' लक्षणं दिसली तर समजा की हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

Heart attack face symptoms: हृदयविकाराचा झटका म्हणजे छातीत तीव्र वेदना होणे, असा अनेकांचा समज असतो, पण हे पूर्ण सत्य नाही. अनेकवेळा हृदयविकाराची लक्षणे छातीशिवाय शरीराच्या इतर भागांवर, विशेषतः चेहऱ्यावर दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणताही छोटा बदल झाला तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देतं. आपलं शरीर एखाद्या गंभीर आजाराकडे झुकतंय, हे आपल्याला आधीच सूचित केलं जातं. — फक्त तो संकेत ओळखता आला पाहिजे. हार्ट अटॅकसारखी गंभीर परिस्थिती देखील आपल्या शरीरात आधी काही लक्षणं निर्माण करते.

आपण बहुतेक वेळा हृदयविकाराच्या झटक्याला छातीत दुखणं किंवा दम लागणं यासोबत जोडतो, पण हे लक्षणं केवळ तिथेच मर्यादित नसतात. फार कमी लोकांना माहिती असेल की, हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावरदेखील काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं ओळखून आपण आपला जीव वाचवू शकतो.

थंड घाम येणं

जर कोणत्याही कारणाशिवाय चेहऱ्यावर वारंवार थंड घाम येत असेल तर हे एक गंभीर लक्षण मानलं जातं. हार्ट अटॅक येण्याआधी शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे शरीर तणावात जातं आणि यामुळे चेहऱ्यावर असा थंड घाम येतो. हा साधा घाम समजून दुर्लक्ष केलं, तर ते धोका ठरू शकतो.

जबड्यामध्ये वेदना

हार्ट अटॅकचा त्रास फक्त छातीतच होत नाही, तो इतर भागांमध्येही पसरतो. अचानक जबड्याला, हनुवटीला, गळ्याला किंवा कानामागेही दुखू लागलं आणि ते एखाद्या काम करताना अधिक वाढलं, तर ते हार्टचं लक्षण असू शकतं.

चेहऱ्याला अचानक सूज येणं

चेहऱ्यावर अचानक सूज येणं, विशेषतः गालावर किंवा डोळ्यांच्या खालच्या भागात, ही रक्ताभिसरण योग्य न होण्याचं लक्षण आहे. ज्यावेळी हृदय शरीरभर योग्य प्रमाणात रक्त पंप करू शकत नाही तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. हे लक्षण हलकं समजू नका.

त्वचेचा रंग बदलणं

शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली की ओठांभोवती किंवा डोळ्यांच्या आसपासची त्वचा फिकट किंवा निळसर दिसू लागते. वैद्यकीय भाषेत याला सायनोसिस म्हणतात. हे अत्यंत गंभीर संकेत आहेत.

चेहऱ्यावर थकवा दिसणं

जर चेहरा अचानक थकलेला, ओशाळलेला दिसू लागला तर हे हृदयासंबंधीची समस्या असू शकते. ज्यावेळी शरीराला जेव्हा योग्यप्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा असं लक्षण दिसून येतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT