Symptoms of liver cancer saam tv
लाईफस्टाईल

Liver Cancer Symptoms: शरीरात हे ४ बदल दिसले तर समजा लिव्हरचा कॅन्सर झालाय; दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी जीवघेणं

Early Symptoms Of Liver Cancer You Should Not Ignore: लिव्हरचा कॅन्सर हा गंभीर आजार असून त्याची लक्षणं सुरुवातीला सूक्ष्म स्वरूपात दिसतात. डॉक्टरांच्या मते शरीरात काही बदल दिसल्यास तातडीने तपासणी करणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल आपल्या आहारात अनेक तळलेले पदार्थ असतात. मात्र तुम्ही चवीसाठी खात असलेल्या खाद्यपदार्थांचा तुमच्या लिव्हरवर परिणाम होत असतो. अयोग्य जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हिपेटायटीस सारख्या इन्फेक्शनमुळे यकृताच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय.

यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकं लिव्हरच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या समस्येला एक सामान्य समस्या मानतात. यामुळे कॅन्सरचं गंभीर स्वरूपात निदान होतं. याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत ते पाहूयात.

मेयो क्लिनिकच्या मते, लिव्हरच्या कॅन्सरची अनेक लक्षणं असू शकतात. मात्र याची ४ लक्षणं अशी आहेत जी तुम्ही ओळखू शकता

वेदना आणि सूज

जर तुम्हाला तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला विशेषतः बरगड्यांच्या खाली सतत सौम्य वेदना, दाब किंवा सूज येत असेल तर त्याला गॅस किंवा आम्लता समजून दुर्लक्ष करू नका. ही वेदना तेव्हा होते जेव्हा लिव्हरमध्ये ट्यूमरचा आकार मोठा होतो. अशावेळी पोटात द्रव जमा झाल्यामुळे वेदना जाणवतात.

वजन कमी होणं

जर तुमचं वजन कोणतंही डाएट किंवा व्यायामाशिवाय कमी होत असेल तर आणि तुमची भूक कमी होत असेल तर ही एक धोक्याची घंटा असू शकते. लिव्हरचा कॅन्सर शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम करतो. अशात जर एखाद्या व्यक्तीला लवकर पोट भरल्यासारखं वाटत असेल आणि भूक कमी लागत असेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी.

कावीळ

कावीळ हे लिव्हरच्या कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण मानण्यात येतं. त्यामुळे त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग आणि नखं पिवळी पडतात. ज्यावेळी लिव्हर योग्यरित्या काम करत नाही आणि रक्तातील बिलीरुबिनची पातळी वाढते तेव्हा हा बदल पाहायला मिळतो. गडद पिवळा किंवा तपकिरी लघवी आणि फिकट रंगाचा मल ही देखील कावीळीची लक्षणं आहेत.

सततचा थकवा

जर तुम्हाला हलक्या कामानंतरही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि विश्रांती घेतल्यानेही तो बरा होत नसेल तर याकडे गांभीर्याने पाहावं लागणार आहे. लिव्हरच्या कॅन्सरमुळे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी तुम्हाला सतत थकवा जाणवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT