High cholesterol symptoms on face saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: डोळ्यांमध्ये हे बदल दिसले तर समजा हार्ट अटॅक येणारे; कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं वाचा

High cholesterol in the eyes: डोळ्यांमध्ये दिसणारे काही बदल हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात. पिवळे थर, पांढरी रेष किंवा दृष्टीत बदल दिसल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. वेळेत निदान केल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या साध्या बदलांकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. जर तुम्हीही असं करत असाल तर थांबा. कारण काही साधे बदलही शरीरातील मोठ्या आजारांचे संकेत देतात. यामधील एक मोठी समस्या म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. अनेकदा कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं उशिरा समोर येतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या काही विशिष्ट लक्षणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढलंय ही समस्या आधीच ओळखता येऊ शकते. तज्ञांच्या मते, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो.

डोळ्यांच्या आसपास पिवळे थर

डोळ्यांच्या आतील कोपऱ्याजवळ किंवा पापण्यांवर दिसणारे पिवळसर, मऊ थर म्हणजे झॅन्थेलाझ्मा. हे त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे तयार होतात. सुरुवातीला कोणतीही वेदना किंवा दृष्टीत अडथळा जाणवत नाही पण हे लक्षण शरीरातील लिपिड वाढल्याचे संकेत देतं.

कडेवर पांढरी रेघ येणं

डोळ्यांच्या बाहेरील भागावर पांढरट किंवा राखाडी रंगाची वर्तुळाकार रेष दिसल्यास त्याला कॉर्नियल आर्कस म्हणतात. ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हे सामान्यपणे दिसून येतं. पण ४० वर्षांखालील व्यक्तींमध्ये हे दिसल्यास तो गंभीर इशारा असू शकतो. अशावेळी कौटुंबिक कोलेस्ट्रॉलची समस्या किंवा हार्ट अटॅकचा धोका असण्याची शक्यता वाढते.

रेटिनामध्ये कोलेस्ट्रॉलचे कण

डोळ्यांच्या आतील रेटिनामध्ये दिसणारे पिवळसर, चमकदार कण म्हणजे होलेनहॉर्स्ट प्लॅक्स. हे प्रामुख्याने मानेतील कॅरोटिड रक्तवाहिन्यांमधून आलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तयार होतात. हे फक्त विशेष तपासणीद्वारेच दिसतात. यामुळे अचानक दृष्टी कमी होणं किंवा तात्पुरती अंधत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.

रेटिनातील रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रेटिनातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊ शकतं. ज्यामुळे अचानक दिसू न लागण्याचा धोका असतो. या स्थितीत रेटिनामध्ये रक्तस्राव, सूज किंवा पांढरे डाग दिसू शकतात. ही आपत्कालीन स्थिती असून, इंजेक्शन, लेझर किंवा इतर उपचारांची गरज भासते.

डोळ्यांवर परिणाम का होतो?

डोळ्यांच्या रक्तवाहिन्या अतिशय बारीक असल्यामुळे त्यामध्ये कोलेस्ट्रॉल लवकर साचतं. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मधुमेह, लठ्ठपणा आणि धूम्रपान यामुळे हा धोका आणखी वाढतो. खासकरून महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हा धोका वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT