Diabetes Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Symptoms: रात्री झोपताना जर 'ही' 3 लक्षणं दिसली तर समजा डायबेटीज झालाय; शरीरातील मोठे बदल ओळखा

Diabetes Symptoms in Marathi: मधुमेह हा आजच्या काळात एक गंभीर आरोग्यसंस्था बनला आहे, जो अनेक लोकांना प्रभावित करतो. असंतुलित आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेह ही एक सामान्य समस्या असून ज्याचा सामना आजकाल बहुतेक लोक करतायत. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे मुलं, तरुण किंवा वृद्ध मधुमेहाला बळी पडतायत. हा एक आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. ज्यावेळी शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. या परिस्थितीला मधुमेह म्हटलं जातं. मधुमेहामुळे हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.

मधुमेहावर वेळीच उपचार करणं खूप महत्वाचं आहे. मात्र यावेळी बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना मधुमेहाची लक्षणं वेळेत समजत नाहीत. आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जे बहुतेकदा रात्रीच्या वेळेस दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.

वारंवार लघवी होणं

मधुमेही रुग्णांना रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागू शकतं. जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीची समस्या असेल तर ते मधुमेहाचं लक्षण असू शकतं. ज्या व्यक्ती रात्री जास्त वेळा लघवीसाठी उठतात त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची तपासणी नक्कीच करावी. ज्यावेळी शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा किडनी ते लघवीद्वारे काढून टाकण्यास मदत होते.

रात्री तहान लागणं

रात्री झोपतानाही जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते आणि तुम्हाला सतत तहान लागू शकते.

रात्रीच्या वेळेस घाम येणं

जर तुम्हाला रात्री एसी असतानाही घाम येत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे देखील एक मधुमेहाचं लक्षण असू शकतं. रात्री जास्त घाम येणं रक्तातील साखरेची पातळी वाढवतं. त्यामुळे जर तुम्हाला रात्री झोपतानाही घाम येत असेल तर ब्लड शुगर टेस्ट करून घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

Astro Tips : तळहातावर ही ८ चिन्हं आहेत का? कळेल Love Marriage होणार की Arrange Marriage!

SCROLL FOR NEXT