Monday Shiva remedies money marriage problems saam tv
लाईफस्टाईल

Somwar che Upay: पैसे किंवा लग्नाची समस्या असेल तर सोमवारी करा हे उपाय; शंकर भगवान प्रसन्न होऊन देतील आशीर्वाद

Monday Shiva remedies money marriage problems: सोमवार हा भगवान शंकराला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची भक्तीभावाने पूजा केल्यास आणि काही विशेष उपाय केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित केलेला आहे. यामध्ये सोमवार हा देवांचा देव महादेव यांना समर्पित केला आहे. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची विशेष पूजा केली जाते. याशिवाय महादेवासाठी उपवासही केला जातो.

असं म्हटलं जातं की, सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ज्योतिषशास्त्रातही भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मदतीने हे उपाय करणं तुमच्या भविष्यासाठी फायद्याचं मानलं जातं.

सोमवारच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत?

गंगाजलाचा अभिषेक

असं म्हटलं जातं की, यामुळे भगवान शिव सर्वात लवकर प्रसन्न होतात. ते पाण्याच्या भांड्यानेही प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. म्हणून, सोमवारी पूजेदरम्यान भगवान शिवांना गंगाजलाचा अभिषेक करा.

शिव रक्षा स्तोत्र

जर तुमच्या जीवनात खूप दुःख आणि संकट असतील तर हा उपाय तुम्ही केला पाहिजे. असं म्हणतात की, सोमवारी शिव रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व संकटे दूर होतील. तसेच, जीवनात आनंद परत येईल.

पसंतीचा जोडीदार हवा असल्यास

जर तुम्हाला तुम्हाला मनासारखा जोडीदार हवा असेल तर सोमवारच्या दिवशी एक उपाय तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. यावेळी सोमवारी योग्य विधींनी भगवान शिवाची पूजा करावी. यावेळी भगवान शिवाला पांढरं चंदन, बेलाची पानं, काळे तीळ, धतुरा, भांग आणि पांढरं फुले अर्पण करा.

इतर उपाय

  • जर तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील तर सोमवारी गंगाजलात काळे तीळ मिसळा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा. यावेळी महामृत्युंजयचा पाठ करा.

  • जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर सोमवारी भगवान शिवाला उसाचा रस अर्पण करा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील आणि आनंद आणि सौभाग्य परत येण्यास मदत होते.

  • समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर सोमवारी मूठभर तांदूळ आणि थोडी साखर कपड्यात बांधून मंदिरात दान करा.

  • जर तुम्हाला नफा होत नसेल किंवा तुमच्या व्यवसायात वाढ होत नसेल, तर काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही दोन पांढरी फुलं ठेवावीत आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना नदीत वाहून द्यावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

SCROLL FOR NEXT