Fashion Tips in marathi, How to wear a saree
Fashion Tips in marathi, How to wear a saree  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पहिल्यांदा साडी नेसताय तर या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्त्रीच्या सौदर्यांत भर घालत असेल तर ती म्हणजे साडी. लग्नकार्यात, समारंभात किंवा इतर कौटुंबिक प्रसंगात पहिले प्राधान्य हे साडीला दिले जाते.आपल्यापैकी बऱ्याच जणींना साडी नेसायला फार आवडते.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच जणांना साडी (Saree) नेसण्याची आवड असते परंतु, ती नेसण्यासाठी आपण नवनवीन मार्ग शोधत असतो. अनेक महिलांना साडी नेसताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. जर साडीला समोरच्या प्लेट्स आणि शोल्डर प्लेट्स नीट लावल्या नाहीत तर साडीचा संपूर्ण लुक खराब होतो.अशावेळी अनेक महिलांना साडी नेसायला खूप वेळ लागतो. त्यामुळेच कधी कधी त्यांची इच्छा असूनही साडी नेसत नाहीत. त्यासाठी अगदी कमी वेळात साडी कशी नेसू शकतात हे पाहूया.

या टिप्स (Tips) फॉलो करा -

१. पहिल्यांदा साडी नेसताना आपल्याला पेटीकोटच्या आत साडी व्यवस्थित खोचावी लागेल. तसेच, जर साडीला फ्रंट प्लेट्स बनवण्याची गरज नसल्यास साडीला खूप घट्ट बांधू नका.

२. साडीला अर्धी व्यवस्थित गुंडाळल्यानंतर उर्वरित साडीच्या बाजूने ६-७ मिऱ्या काढून घ्या. त्या नीटपणे पिनअप करुन पेटीकोटमध्ये खोचाव्यात.

३. ड्रेपिंग स्टायलिश पद्धतीने उर्वरित साडीने पदर काढा. साडीच्या पदरासाठी आपण पातळ खांद्याचे प्लेट्स बनवून पदर खांद्यावर काउल स्टाईलमध्ये ठेवू शकतो.

४. पदराला ब्लाउजच्या मागच्या बाजूने आपण पिनअप करु शकतो त्यामुळे आपला पदर नीट बसेल.

५. फॅशनेबल (Fashion) साडीसाठी आपण स्टायलिश क्रॉप टॉप ब्लाउज किंवा ब्रा टॉप ब्लाउज निवडू शकतो. साधे दिसणारे ब्लाउज फॅशनेबल साडी ड्रेपिंग स्टाइलमध्ये चांगले दिसणार नाहीत.

६. आपण जर स्टायलिश स्टाईलमध्ये साडी नेसत असू तर त्यासोबत हेअर स्टाइलकडे लक्ष द्या कारण या साडी ड्रेपिंग स्टाइलसोबत आपण साधी हेअरस्टाइल ठेवली तर आपला लुक खराब होऊ शकतो.

अशाप्रकारे आपण साडी नेसू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mira Rajput Kapoor : बॅकलेस सूटमध्ये शाहिदच्या पत्नीचा किलर लूक

Today's Marathi News Live : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील निकालाचं स्वागत - CM शिंदे

Ravindra Waikar: ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर शिंदे गटात गेले, ठाकरे गटाने पाठवली नोटीस

Priya Bapat-Umesh Kamat: प्रिया-उमेशचा रोमँटिक अंदाज; ट्रीपचे फोटो पाहा

Nashik News : बारागाड्या ओढताना ५ जण जखमी; अक्षय तृतीयेला यात्रोत्सव समारोपावेळी अपघात

SCROLL FOR NEXT