while giving house on rent
while giving house on rent ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

घर भाड्याने देताय तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक आपले घर भाड्याने देतात. बरेच लोक एकापेक्षा जास्त घरे खरेदी करतात, जेणेकरून त्यांना भाड्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल आणि अतिरिक्त मालमत्ता देखील मिळेल.

हे देखील पहा -

आर्थिक गुतंवता वाढवण्यासाठी आपल्यापैकी बरेच लोक घर किंवा इतर गोष्टीत गुतंवणूक करतात. एक घर (Home) असूनही आपण दुसरे घर घेतो आणि तिथे आपण भाडेकरु ठेवतो. परंतु आपण घर कोणाला भाड्याने देत आहोत हे तपासून पहा. त्यांची योग्य ती चौकशी करा. घर भाड्याने देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा अडचणी येऊ शकतात. त्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

घर भाड्याने देत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

१. घर भाड्याने देण्याआधी, आपण कोणत्या व्यक्तीला घर देत आहोत याची खात्री करा. आपल्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा आपल्या जवळील व्यक्तीच्या ओळखतील आपल्याला माहीत असणाऱ्या लोकांना घर देण्याचा प्रयत्न करा किंवा ते पूर्वी ज्या ठिकाणी राहायचे त्या जुन्या भाडेकरूशी बोला.

२. घर भाड्याने देण्याआधी फक्त त्याचा आधार आणि पॅनकार्ड तपासू नका, तर त्याचे ऑफिस आयडी देखील तपासून तिथे चौकशी करा.

३. घर भाड्याने देत असलेल्या व्यक्तीसोबत भाडे करार केल्याची खात्री करुन घ्या.त्या करारनाम्यात त्याचे नाव (Name), पत्ता, वडिलांचे नाव, घरात किती सदस्य राहाणार आहेत तसेच भाड्याची रक्कम आदी व्यवस्थित नमूद करा. घरात आपल्या काही वस्तू असतील तर त्याची देखील नोंद ठेवून त्यावर भाडेकरूची सही घ्या.

४. पोलिस (Police) व्हेरिफिकेशन करून घेतल्यास आपण ठेवलेल्या भाडेकरूबद्दल पोलिसांना सर्व माहिती ज्ञात असेल. जर भाडेकरूने काही मोठी चूक केली तर, पोलिस सहजपणे गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतात आणि आपली मदत केली जाईल.

५. आपल्या सोसायटीच्या रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनकडून आपल्या घराविषयी सर्व अपडेट वेळोवेळी मिळवत रहा. आपण ठेवलेला भाडेकरू वेळेवर घराची देखभाल करत आहे की नाही हे तपासत रहा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT