डेटिंग अँपवर फोटो अपलोड करण्याच्या काही टिप्स ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

तुम्ही देखील डेटिंग अँप्स वापरत असाल, तर हे लक्षात ठेवा.

डेटिंग अँप्सवर फोटो अपलोड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई - इंटरनेट आणि डिजिटलायझेशनच्या युगात, ऑनलाइन जोडीदार शोधणे आता सहज शक्य झाले आहे. सध्या यासाठी अनेक डेटिंग साइट्सही उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पसंतीचा जोडीदार निवडू शकता. आधुनिकतेच्या या युगात, आपला जोडीदार निवडण्यासाठी अनेक लोक डेटिंग साइट्सची मदत घेतात. जर तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला डेटिंग (Dating) अँपवरून निवडत असाल तर, या दरम्यान तुम्हाला तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. त्याचबरोबर डेटिंग अँपच्या प्रोफाइलमध्ये फोटो अपलोड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

डेटिंग अँपवर माहिती शेअर करताना, बहुतेक लोक प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची बारकाईने काळजी घेतात. जरी सहसा डेटिंग अँप्सवर, लोकांचे पहिले लक्ष प्रोफाइल फोटोकडे जात असले तरी अशा परिस्थितीत, डेटिंग अँपवर फोटो अपलोड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही सहजपणे स्वतःसाठी सर्वोत्तम जोडीदार निवडू शकता.

हे देखील पहा -

खरेतर डेटिंग अँपवर सर्च करताना लोकांची नजर सर्वात आधी तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर जाते. अशा परिस्थितीत प्रोफाइल फोटोतील कोणतीही चूक तुमची सर्व मेहनत खराब करू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला डेटिंग अँपवर फोटो अपलोड करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय स्वतःसाठी योग्य जोडीदार (Partner) शोधू शकता.

या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

१. फिल्टरचा वापरू नका -

सहसा लोकांना सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना फिल्टर वापरण्याची सवय असते. अशा परिस्थितीत डेटिंग अँपच्या प्रोफाइलमध्येही स्वत:ची चांगली छाप पाडण्यासाठी फिल्टरची मदत घेतात. तथापि, यामुळे डेटिंग अँपवर तुम्हाला आवडणाऱ्या जोडीदारावर तुमच्याबद्दल चुकीची छाप पडू शकते त्यामुळे तुमच्याबद्दलचे मत बिघडण्याची शक्यता वाढते.

२. ग्रुप फोटो टाकू नका -

डेटिंग अँपवर ग्रुप फोटो (Photo) अपलोड करू नये. यामुळे इतरांच्या गोपनीयतेवरच परिणाम होत नाही तर तुमची इतरांशी तुलना होऊ लागते. त्यामुळे डेटिंग अँपवर कुटुंब आणि मित्रांच्या ग्रुप फोटोंऐवजी फक्त तुमचा एकच फोटो अपलोड करा.

३. बोल्ड फोटो अपलोड करू नका -

डेटिंग अँप्सवर खूप बोल्ड फोटो अपलोड करणे टाळा. यामुळे लोक तुमच्या प्रोफाइलमध्ये जास्त रस घेणार नाहीत. तसेच, तुमच्या बोल्ड फोटोंचाही गैरवापर होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT