Hair care tips, Benefits of hibiscus flower ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

डोक्याला टक्कल पडलय तर, जास्वंदीच्या फुलांचा होईल उपयोग !

जास्वंदीच्या फुलांचा केसांसाठी कसा फायदा होईल जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : गणपतीला प्रिय असणारे जास्वंदीचे फूल हे केसांसाठी देखील लाभदायक ठरते. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करत असतो. परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्याला केसांकडे अधिक लक्ष देता येत नाही.

हे देखील पहा -

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. औषधांचा वापर करत असतो तर काही वेळेस औषधांचा वापर करत असतो. तरीदेखील केस गळतीची समस्या आपल्याला सारखी सतावत असते. यासाठी आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केस गळतीची समस्या रोखू शकतो तसेच, केसांना अधिक मजबूतही करु शकतो. जास्वंदीच्या फुलाचा व पानांचा वापर करुन आपण केसांची काळजी घेऊ शकतो. आयुर्वेदात जास्वंदीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. याचा केसांना कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

१. आपले केस रुक्ष झाले असतील व त्याची वाढ थांबली असेल तर जास्वंदीच्या फुलांचा वापर आपण करु शकतो. यांत असणारे घटक केसांच्या पोषक तत्वासाठी चांगले असतात. तसेच केसांचा कोरडेपणा देखील दूर होतो.

२. प्रदूषणामुळे बहुतेक लोकांच्या केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. तसेच केसांच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. जास्वंदीचे तेल (Oil) केसांना लावल्यास कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.

३. केस अकाली पांढरे होत असतील तर जास्वंदीच्या तेलाचा त्यासाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि मेलेनिन नावाचे घटक असतात, जे केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यास मदत करतात.

४. आजकाल केस (Hair) गळतीची समस्या ही अधिक वाढत आहे. त्यामुळे केसांना टक्कल पडणे सातत्याने वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी जास्वंदच्या फुलांचा केसांसाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क बनवून केसांना लावल्याल फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

SCROLL FOR NEXT