आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल बटाटा !

बटाट्यातील गुणधर्माविषयी जाणून घ्या.
Potato benefits, Health tips
Potato benefits, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना बटाटा खायला आवडतो. बटाटा वड्यापासून ते बटाटाच्या भाजीपर्यंत त्याचा उपयोग पुरेपुर केला जातो. परंतु, चांगल्या आरोग्यासाठी बटाटा खाण्याचे प्रमाण अंत्यत कमी होताना दिसून येत आहे.

हे देखील पहा -

वजन वाढेल या कारणामुळे बटाट्याचे कोणतेही पदार्थ खाण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. स्वयंपाकघरात बटाट्याला अधिक महत्त्व आहे. घरात कोणतीही भाजी नसेल तर आपण बटाट्याला पर्यायी पदार्थ म्हणून त्याचा वापर करतो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी आणि मेंदू, मूत्रपिंड, हृदयाचे स्नायू आणि मध्यवर्ती मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. बटाट्यातील अतिरिक्त कर्बोदके आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. परंतु, बटाट्याचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते ते कसे जाणून घेऊया.

१. उकडलेले बटाटे किंवा वेगवेगळ्या पध्दतीने शिजवलेल्या बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. नाश्त्याच्या वेळी उकडलेला बटाटा खाल्ल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.

Potato benefits, Health tips
मक्याचे पीठ आणि त्याच्या स्टार्चमधील फरक माहित आहे का?

२. बटाटे हे दोन प्रकारात विभागले जातात. पिष्टमय बटाटे मॅश केलेले किंवा बेक केलेले स्वरूपात सेवन केले जाऊ शकतात. तर मेणयुक्त बटाटे उकडलेल्या स्वरूपात खाणे फायदेशीर आहे. सॅलडमध्ये उकवडलेला बटाटा फायदेशीर ठरेल.

३. व्हिनेगरसोबत बटाटा खाल्ल्याने त्वचेसाठी फायदा होतो. व्हिनेगरचे आम्लीय गुणधर्म बटाट्यांमधील पेक्टिन लवकर नष्ट करतात. व्हिनेगर शरीरातील ग्लायसेमिक आणि इन्सुलिनिक प्रतिक्रिया कमी करते.

४. बटाट्यात (potatoes) अधिक प्रमाणात फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती वाढण्यास मदत होते. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क, ब-६, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक व फॉस्फरस आढळते त्यामुळे त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो. तसेच कच्च्या बटाट्याचा रस त्वचेला लावल्यास त्वचेचा रंग देखील सुधारतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com