Aadhaar Card Update Saam Tv
लाईफस्टाईल

अजूनही Aadhaar Card Update केल नसेल तर लगेच करा, अंतिम मुदत 14 डिसेंबर; ऑनलाइन कसे कराल? जाणून घ्या

Free Aadhaar Card Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची अंतिम मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली होती. UIDAI ने 6 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले होते.

Shraddha Thik

Last Date Of Aadhaar Updation :

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची अंतिम मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली होती. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट (Update) फ्री करता येणार आहे. UIDAI ने 6 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, 15 सप्टेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माय आधार पोर्टलद्वारे तुम्ही आधार अपडेट करू शकता -

https://myaadhaar.uidai.gov.in/ वर My Aadhaar पोर्टलद्वारे फ्री आधार कार्ड तपशील अपडेट करण्याची सुविधा डिसेंबरमध्ये 14 तारखेपर्यंत मोफत सुरू राहील. UIDAI 10 वर्षांपेक्षा जुन्या आधार (Aadhaar) धारकांना नवीन माहितीसह तपशील अपडेट करण्याचे आवाहन करत होते.

UIDAI वेबसाइटनुसार, डेमोग्राफिक माहितीची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी कृपया आधार अपडेट करा. ते अपडेट करण्यासाठी, तुमचा ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा अपलोड करा. असे सांगण्यात आले आहे.

मोफत अपडेट सुविधा https://myaadhaar.uidai.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे तर CSC वर फिजिकल अपडेटसाठी पूर्वीप्रमाणे 25 रुपये शुल्क आकारले जाईल.

आधारमध्ये पत्ता मोफत कसा अपडेट करायचा?

स्टेप 1: https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा

स्टेप 2: लॉगिन करा आणि 'अपडेट नाव/लिंग/जन्म आणि पत्त्याची अपजडेट' वर क्लिक करा/निवडा

स्टेप 3: 'आधार ऑनलाइन अपडेट करा' वर क्लिक करा

स्टेप 4: डेमोग्राफिक पर्यायांच्या सूचीमधून 'पत्ता' निवडा; आणि 'आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा

स्टेप 5: स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि आवश्यक डेमोग्राफिक माहितीसाठी एंटर करा.

स्टेप 6: रु.25 भरा. (14 डिसेंबरपर्यंत आवश्यक नाही).

स्टेप 7: सेवा विनंती क्रमांक (SRN) जनरेट केला जाईल. ते नंतर ट्रॅकिंग स्थितीसाठी जतन करा. अंतर्गत गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक SMS प्राप्त होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Today Gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

Bigg Boss 19: बिग बॉस १९चा विनर आधीच ठरला?; घरात झालेल्या भांडणामध्ये 'या' स्पर्धकाने सगळं सांगितलं

गणपतीच्या मुलीचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT