Clothes cleaning tips in marathi
Clothes cleaning tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात धुतलेल्या कपड्यांना वास येत असेल तर हे करुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतर ते लवकर सुकत नाही व त्याचा वास येऊ लागते. पावसामुळे कपडे सुकवण्यासाठी सूर्यप्रकाश व हवा नसल्यामुळे कपडे सुकत नाही.

हे देखील पहा -

पाऊस व दमट हवामानामुळे कपडे कोरडे राहात नाही. त्यामुळे कपड्यांचा कुबट वास येतो. अशावेळी कपडे स्वच्छ (Clean) व कोरडे जवळजवळ अशक्य आहे. पावसाळ्यात कपडे ओलसर, घाण आणि दुर्गंधीयुक्त राहतात. कपडे धुण्यापेक्षा कपडे सुकवणे कठीण आहे अशावेळी या टिप्स फॉलो करा.

१. पावसात कधीही कमी दर्जाची डिटर्जंट पावडर वापरू नका. खराब वॉशिंग पावडर मशिनमध्ये धुतल्यानंतरही कपड्यांना चिकटते आणि दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे कपड्यांचे नुकसानही होते.

२. बादलीत कपडे धुताना पाण्यात पांढरा व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिसळा. व या पाण्यात कपडे पिळून सुकत घाला. कपड्यांची दुर्गंधी कमी करेल आणि पावसात वाळलेल्या कपड्यांमध्येही टिकून राहणाऱ्या वासापासून मुक्त होण्यास मदत करेल.

३. पावसाळ्यात (Monsoon) ऊन-पाऊस सुरू असते व हवा देखील येत असते. अशावेळी कपडे थोड्या उन्हात व हवेशीर जागेत सुकत घाला. ज्यामुळे कपड्यांचा वास येणार नाही.

४. कपडे मशीनमधे धुत असू व त्यातच सुकवत असू तर सुकवलेले कपडे हवेशीर जागेखाली नंतर वाळत घाला. त्यामुळे कपड्यांचा कुबट वास येणार नाही.

५. वास न येता घाईघाईत कपडे सुकवायचे असतील तर ते सुकविण्यासाठी आपण इस्त्री किंवा हेअर ड्रायर देखील वापरू शकतो. यासाठी हलक्या ओल्या कपड्यांना इस्त्री करा आणि त्यांचा ओलावा पूर्णपणे सुकवू द्या. ते थोडे कोरडे झाल्यावर त्यांना लटकवा आणि पंख्याच्या हवेत सोडा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

SCROLL FOR NEXT