Heart attack news saam t
लाईफस्टाईल

Heart Attack : कोविड व्हॅक्सिनमुळे हार्ट अटॅक? AIIMS- ICMR च्या अहवालात मोठा खुलासा, VIDEO

covid vaccine : कोविड व्हॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र याचं चर्चांना आयसीएमआर आणि एम्सनं केलेल्या अभ्यासानं पुर्णविराम लागलाय. या दोन्ही संस्थांनी नेमकं अहवालात काय म्हटलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

कोरोनानंतर देशभरात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलयं, असा दावा केला जात होता. मात्र इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एका अभ्यासानंतर कोविड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा फेटाळून लावण्यात आलाय. ICMR आणि AIIMS नं या अभ्यासानंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलयं पाहूयात...

अहवालासाठी मे ते ऑगस्ट 2023 पर्यंत 19 राज्य आणि 47 रुग्णालयाचा अभ्यास

ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक मृत्यू झालेल्यांचा अभ्यास

कोविड व्हॅक्सिन आणि हृदयविकाराचा संबंध नाही

भारतात कोविड-19 प्रतिबंधक व्हॅक्सिन सुरक्षित

आनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली हृदयविकाराला कारणीभूत

दरम्यान कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. मुळात आनुवंशिकता, बदलती जीवनशैली, फास्ट फुडचं अतिसेवन, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या अशी अनेक कारणं तरुणांमधील हार्ट अटॅकमागे असू शकतात.. तरी नियमित व्यायाम आणि आजारावर वेळीच उपचार घेतल्यास हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT