How to Handle Emotion Saam Tv
लाईफस्टाईल

How to Handle Emotion: छोट्या छोट्या गोष्टींनी Hurt होताय? कसे कराल स्वत:ला इमोशनली स्ट्राँग

Emotional Attachment : प्रत्येक वेळी भावनिक होणे चूक असते असे केल्याने आपला प्रभाव हा चुकीचा पडतो.

कोमल दामुद्रे

Dealing With Difficult Emotions : आपल्या आजूबाजूला बरेचदा अशी माणसे असतात ज्यांना प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन वाईट वाटते. त्यांची मस्करी केली किंवा त्यांना रागवून बोले तरी रडू येते. परंतु कामाच्या ठिकाणी असे वागणे हे कठीण होते.

जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रांना आपल्या अशा स्वभावाबद्दल माहित असते. परंतु, प्रत्येक वेळी भावनिक होणे चूक असते असे केल्याने आपला प्रभाव हा चुकीचा पडतो. त्यामुळे संपूर्ण दिवस तणावात जातो. आज आम्ही तुमच्यासोबत अशाच काही टिप्स शेअर करणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील. माझ्यावर विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या अर्ध्या समस्या सुटतील.

1. प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवण्याची सवय सोडा

जेव्हा तुम्ही कोणाकडून खूप अपेक्षा ठेवता व त्या पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला त्रास होतो. तेव्हा एकच उपाय (Remedies) आहे की तुम्ही तुमची ही सवय सोडली पाहिजे. ज्यांच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे त्यांच्याकडून आशा ठेवा.

2. चांगल्या लोकांसोबत रहा

तुमच्यासारख्या कमी-अधिक प्रमाणात लोकांसोबत राहा, कारण ते लोक तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि तुम्हाला दुखावण्याचा विचारही करणार नाहीत. इतरांमध्ये दोष शोधणाऱ्या लोकांची संगत टाळा. असे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात आणि तुम्हाला दुखावतात.

3. स्वतःच्या कमतरता ओळखा

जर कोणी तुम्हाला असे काही बोलले असेल, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ (restless) होत असाल तर त्यावर ताण घेण्याऐवजी बसून विचार करा की त्याचे कारण काय असू शकते. तुमच्या स्वभावातील काही निदर्शनास आले असेल तर नाराज होण्याऐवजी ती कमतरता दूर करण्याचा विचार करा.

4. उत्तर देणे आवश्यक आहे

भावनिक लोक कधीकधी इतरांच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ शकत नाहीत, ज्यामुळे ते विचार करून अस्वस्थ होत राहतात, म्हणून उत्तर देणे हा सोपा उपाय आहे. जर तुम्हाला कोणाची एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती गोष्ट ऐकण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिका. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही भावनिक दुखापत टाळता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच ग्राहकांना झटका! तूप-बटरच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर|VIDEO

Political News: मोठी बातमी! काँग्रेसकडून एकाचवेळी २०० नेत्यांचं तडकाफडकी निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत मोठी वाहतूक कोंडी

लाडकी बहीण योजना E-KYC मुदत वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार; गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT