Office Time Healthy Snacks
Office Time Healthy Snacks Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Snacks : तुम्हाला देखील ऑफिसच्या वेळात भूक लागते ? अस्वस्थ वाटते ? या हेल्दी स्नॅक्सचे सेवन करा

कोमल दामुद्रे

Healthy Snacks : जेवल्यानंतर किंवा जेवण्यापूर्वी ऑफिसमध्ये आपल्याला भूक लागते. भूक शांत केली नाही तर पोटातून आवाज येतो, डोके दुखी उद्भवते किंवा कामात लक्ष लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी, लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. बर्‍याच वेळा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान खूप भूक लागते. कधी कधी ऑफिसच्या मधल्यावेळी भूक लागल्यावरदेखील त्रास होतो.

भूक क्षमवण्यासाठी आपण अशावेळी चिप्स किंवा तळलेल्या पदार्थांना प्रामुख्याने निवडतो. यामुळे आपली भूक त्यावेळी क्षमवली जाते परंतु, आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. आपल्या जिभेला जंक फूडची सवय लागल्यामुळे आपण त्यांना हेल्दी स्नॅक्स म्हणून निवडतो.

पण आपण मधल्या वेळी भूक लागल्यास अशा काही पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी होणार नाही. जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल

१. बदाम -

Almond

आपण अशावेळी बदामाचे सेवन केल्याने आपल्याला फायबर, प्रथिने, जीवनसत्त्व ई व अनेक पोषकतत्वे मिळतात. यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.

२. पॉपकॉर्न -

Popcorn

पॉपकॉर्नला आपण हेल्दी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे आपले पोट भरलेले राहाते.

३. अंडी-

Egg

अंड्यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. यांमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते. तसेच याचे सेवन केल्याने भूक लागत नाही.

४. चणे -

Gram

ऑफिसमध्ये (Office) काम करताना भूक लागल्यावर चण्याचे सेवन करा. चण्यामध्ये कॅल्शियम (Calcium)मुबलक प्रमाणात आढळते. त्याचबरोबर चण्यामध्ये जीवनसत्त्व क (Vitamin-C) मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मेंदूला काम करण्याची चालना देते व यामुळे हाडेही मजबूत होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT