High Cholesterol google
लाईफस्टाईल

High Cholesterol Symptoms: पायावर ही ५ लक्षणे दिसल्यास व्हा सावध! असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

High Cholesterol: चालताना दिसणारी पायात सूज, थंड पाय, छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास किंवा वेदना ही उच्च कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणे आहेत. वेळेत ओळखून गंभीर आजार टाळता येतात.

Sakshi Sunil Jadhav

  1. चालताना दिसणारी पायात सूज आणि थंड पाय ही उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे आहेत.

  2. छातीत दुखणे आणि श्वास घेताना त्रास होणे ही लक्षणे सामान्य नाहीत.

  3. पायातील वेदना किंवा गोळे पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण आहेत.

  4. वेळेत लक्षणे ओळखल्यास गंभीर आजार टाळता येतात आणि रक्ताभिसरण सुधारता येते.

कोलेस्ट्रॉल हा शरीरातल्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारा एक प्रकारचा फॅट असतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या कोणत्याही भागात दिसतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आरोग्याकडे कमी लक्ष देतो. पण शरीर आपल्याला दररोज काही संकेत देतं, जे वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा ते थेट गंभीर अवस्थेत आपल्याला जाणवायला लागतं. विशेषतः चालताना दिसणारी काही लक्षणे ही उच्च कोलेस्ट्रॉलची असू शकतात. ही वेळेत ओळखली, तर मोठ्या आजारांपासून तुम्हाला लांब राहता येईल.

कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणे

१) पायांना किंवा गुडघ्यांना सुज येणे.

चालल्यानंतर पाय किंवा गुडघ्यांना सूज येत असेल, तर ते रक्ताभिसरणात अडथळा असल्याचे लक्षण असू शकते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्यामुळे पायांच्या तळव्यांना अचानक घाम येतो. हे सामान्य लक्षण असले तरी तुम्ही डॉक्टरांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.

२) पाय थंड होणे.

पाय थंड गरम हे हवे नुसार होत असतात. तुमच्या वातावरणाचा परिणाम तुमच्या शरीरावर लगेचच जाणवतो.

साध्या हवेतही पाय किंवा बोटे थंड वाटत असतील, तर कोलेस्ट्रॉलचा फॅट रक्तवाहिन्यांमध्ये अडकतो आणि रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे पायांना उष्णता मिळत नाही. म्हणून पाय थंड पडतात.

३) छातीत अस्वस्थता जाणवणे.

चालताना छातीत दुखणं, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ते अॅन्जायनाचे लक्षण असू शकतं. हा त्रास हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे निर्माण होतो. कधी कधी ही लक्षणे उच्च कोलेस्ट्रॉलशी संबंधित असतात.

४) श्वास घेण्यास त्रास

पूर्वी सहज चालता येत होतं, पण आता थोडं चालल्यानंतरही दम लागत असेल तर हे हृदयाला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे होतं. त्यामागे उच्च कोलेस्ट्रॉल हे एक कारण असू शकतं.

५) पायात वेदना किंवा गोळे येणे.

थोडं चालल्यानंतर पायात वेदना किंवा गोळे येत असतील, तर हे पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण आहे. यात पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून रक्तप्रवाह अडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT