EPFO Money Withdraw : हल्ली लग्न करणे म्हणजे आर्थिक अडचणींचा सामना करण्यासारखेच. लग्न म्हटलं की, आर्थिक बजेट नीट असायला हवा. स्वत:चे लग्न असो की मुलांचे, पैशांची व्यवस्था करणे ही एक वेगळीच डोकेदुखी ठरते.
पण जर तुमचे EPFO चे खाते असेल तर तुमचा हा त्रास अधिक प्रमाणात कमी होऊ शकतो. आता EPFO मधून आपल्याला आगाऊ पैसे (Money) मिळण्याची किंवा काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
1. कसा होतो PF चा उपयोग
अनेक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी सामाजिक सुरक्षेचा सर्वात मोठा आधार म्हणजे पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी. हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे व्यवस्थापित केले जाते. आपल्या आयुष्यात येणार अनेक कठीण प्रसंगासाठी हे फायदेशीर ठरते. तसेच निवृत्त झाल्यानंतरही आयुष्यभर पैशांची हमी आपल्याला त्यातून मिळते.
2. कोविडच्या काळात मिळाला दिलासा
EPFO अनेक प्रसंगी आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देते. जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा EPFO ने आपल्या ग्राहकांना Covid Advance (EPF Covid Advance) ची सुविधा दिली. त्याचप्रमाणे तुमची नोकरी गेली तरी तुम्हाला पीएफ काढण्याची सुविधा मिळते. त्याचप्रमाणे तुम्हाला घर विकत घ्यायचे असेल किंवा दुरुस्त करायचे असेल, तुमचे स्वतःचे लग्न असो किंवा मुलांचे, तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता.
3. ईपीएफओने ही माहिती दिली
नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये EPFO ने लग्नानिमित्त पीएफमधून पैसे काढण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. EPFO च्या ट्विटनुसार, जर ग्राहकाचे स्वतःचे लग्न किंवा भाऊ-बहीण किंवा मुला-मुलीचे लग्न (Marriage) असेल तर अशा प्रसंगी EPFO मॅरेज अॅडव्हान्सची सुविधा घेता येईल. या अंतर्गत तुमच्या शेअरच्या ५० टक्के इतकी रक्कम व्याजासह काढता येईल.
4. या दोन गोष्टी लक्षात ठेवा
ईपीएफओ मॅरेज अॅडव्हान्स अंतर्गत पीएफमधून पैसे काढण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. ईपीएफओनेही या अटींबाबत सांगितले आहे. पहिली अट म्हणजे तुम्ही किमान सात वर्षे EPFO चे सदस्य असायला हवे. तर दुसरी अट म्हणजे तुम्ही लग्न आणि शिक्षणासह ३ पेक्षा जास्त वेळा अॅडव्हान्सची सुविधा घेऊ शकत नाही. म्हणजे लग्न किंवा शिक्षणाच्या नावावर पीएफमधून जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.