Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : टॅनिंग टाळण्यासाठी असा करा कोरफडचा वापर करा

Alovera Gel : केमिकलयुक्त उत्पादन त्वचेला हानी पोहोचवू शकते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी देखील तुम्ही वापरू शकता.

कोमल दामुद्रे

Skin Tanning : प्रदूषण आणि हानिकारक अतिनील त्वचेला नुकसान करण्याचे काम करतात. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करतो. मात्र केमिकलयुक्त उत्पादन त्वचेला हानी पोहोचवू शकते. म्हणून अशा परिस्थिती त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी देखील तुम्ही वापरू शकता.

कोरफडचा वापर सनस्क्रीन म्हणून केल्यास त्वचेला (Skin) खूप फायदा (Benefits) होईल. कोरफडमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्म रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास सहकार्य करतात. कोरफड सोबतच इतर अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही सनस्क्रीन तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी माहिती.

चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा वापरायचा असेल. तर एका वाटीत एक चमचा हळद आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करून तुम्ही हे सनस्क्रीन म्हणून वापर करू शकता.याशिवाय तुम्ही एलोवेराचा वापर त्वचेसाठी क्यूब्सच्या स्वरूपातही करु शकता. तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर एलोवेरा क्यूब्स वापरू शकता. एलोवेरामुळे तुमची त्वचा सॉफ्ट राहते.

एका बाउलमध्ये एलोवेरा जेल घेऊन त्यात एक चमचा नारळ तेल टाका. आता त्यात पेपरमिंट ऑइलचे (Oil) ५ थेंब घालून या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही तयार पेस्ट तुम्ही त्वचेसाठी वापरू शकता.

एलोवेराचा या पद्धतीने वापर करता येतो, त्यासाठी एलोवेरा जेल एका बाउलमध्ये घ्या आणि त्यात अक्रोड तेल, शिया बटर, नारळ तेल आणि झिंक ऑक्साईड घाला. आता या सर्व गोष्टी मिक्स करून तुम्ही तयार झालेली ही पेस्ट तुम्ही सनस्क्रीनप्रमाणे वापरू शकता.

एका वाटीत एलोवेरा जेल , व्हिटॅमिन ई ऑईल, सूर्यफुल तेल आणि झिंक ऑक्साईड घालून. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. याचा वापर तुम्ही सनस्क्रीनप्रमाणे करू शकता. हे मिश्रण तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

22 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; कुटुंबीय, नातेवाईकांचा गोंधळ, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

SCROLL FOR NEXT