How to heal after being cheated on Saam TV
लाईफस्टाईल

Breakup Tips: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर स्वतःला कसं सांभाळाल? 'या' टीप्स नक्कीच करतील तुमची मदत

How to heal after being cheated on: प्रेमसंबंधात (Relationship) धोका किंवा विश्वासघात (Betrayal) होणे हा जीवनातील सर्वात कठीण आणि हृदयद्रावक अनुभव असतो. या घटनेमुळे होणारा आघात केवळ भावनिक नसतो, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला आणि मानसिक आरोग्यालाही धक्का देतो.

Surabhi Jayashree Jagdish

प्रेम ही एक वेगळीच भावना असून ती मनाला भारावून टाकते. कधी कधी प्रेमात फसवणूक झाल्यानं केवळ हृदयाला दुखापत होत नाही, तर आत्मविश्वासावर आणि मानसिक शांततेवरही त्याचा खोल परिणाम होतो.

जर तुमचंही ब्रेकअप झालं असेल आणि तुम्हीही अशा वेदनेतून जात असाल तर घाबरण्याचं कारण नाही. काही सोप्या आणि प्रभावी पद्धतींच्या मदतीनं तुम्ही स्वतःला सावरू शकता आणि पुन्हा आयुष्यात आनंदाने जगायला सुरुवात करू शकता.

इमोशन्स दाबून ठेवू नका

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर राग, दुःख, निराशा अशा अनेक भावना मनात येणं स्वाभाविक आहे. या भावना आत दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना व्यक्त द्या. रडणं, आपल्या भावनांना लिहून ठेवणं किंवा विश्वासू मित्राशी बोलणं यामुळे मन हलकं होतं.

स्वतःला वेळ द्या

फसवणुकीनंतर लगेच नवीन नात्यात जाण्याची घाई करू नका. स्वतःला समजून घेण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी वेळ द्या. या काळात आपल्या आवडी, छंद आणि स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचं मनोबल वाढेल, विचार स्पष्ट होतील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात.

सोशल मीडियापासून काही काळ दूर रहा

आजच्या काळात सोशल मीडिया सतत एक्स पार्टनरच्या आठवणी जागवतो. त्याचे फोटो, पोस्ट किंवा अपडेट्स पुन्हा पुन्हा पाहून मन अस्थिर होतं. त्यामुळे काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहणं, मनाला विश्रांती देणं गरजेचं आहे.

स्वतःवर प्रेम करा

फसवणुकीनंतर अनेकदा आपण स्वतःलाच दोष देतो. पण लक्षात ठेवा कोणाच्याही चुकीच्या निर्णयाचा तुमच्या मूल्यांवर परिणाम होत नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची प्रशंसा करा आणि आपल्या गुणांची आठवण ठेवा. यामुळे आत्मसन्मान पुन्हा दृढ होतो.

नव्या सुरुवातीसाठी तयार व्हा

काळ जसजसा पुढे सरकतो तशा वेदना कमी होऊ लागतात. त्यावेळी नव्या सुरुवातीसाठी मन मोकळं करण्याची वेळ येते. नवीन मित्र जोडा, नवीन उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Alert : शेकोटी पेटल्या! राज्यात तापमानाचा पारा घसला; 'या' जिल्ह्यांत गुलाबी थंडी, वाचा हवामानाचा अंदाज

Mahayuti Clash: सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात; मंत्री लोढांच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना डिसेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Upit Recipe: आचारी स्टाईल मऊसूत उपीट कसं बनवायचं?

Maharashtra Live News Update: नागपूर शहरात थंडीची हुडहुडी वाढली, पारा घसरला

SCROLL FOR NEXT