Pregnancy care tips in Marathi, Skin care tips
Pregnancy care tips in Marathi, Skin care tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Pregnancy Care : गर्भावस्थेत त्वचेची काळजी कशी घ्याल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गर्भावस्थेत स्त्रियांना खाण्यापिण्यापासून ते शरीराची व त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच या काळात अधिक त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. डाग आणि पिगमेंटेशनची समस्या वाढते. यासोबतच त्वचा (Skin) निस्तेज होऊ लागते, टाचांनाही तडा जाऊ लागतो. एवढेच नाही तर पोटाच्या आजूबाजूच्या भागात खाज सुटू लागते. (Pregnancy care tips in Marathi)

हे देखील पहा -

प्रसूतीपूर्व व नंतर निरोगी राहण्यासाठी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी, आपण विशेष काळजी आणि निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी नैसर्गिक लोशन, क्रीम्सचा वापर करावा. त्वचेची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.

गर्भावस्थेत त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

१. गर्भावस्थेत (Pregnant) महिलांच्या त्वचेला कोमलता आणि लवचिकता आवश्यक असते. अशावेळी त्वचेला कोरडेपणा येतो आणि खाज सुटते. यावेळी त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवला पाहिजे. शरीराची त्वचा मऊ ठेवण्यासाठी कोको बटर असलेले मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन लावायला हवे.

२. गर्भावस्थेत त्वचेवर ताण आल्याने स्ट्रेच मार्क्स आणि रॅशेस येतात. घामामुळेही खाज सुटते. पुरळ आणि वण्र ओटीपोटावर येऊ लागतात. अशावेळी गरोदर महिलांसाठी अँटी-रॅश क्रीम्स फायदेशीर ठरते. हे लावल्याने खाज सुटणार नाही आणि त्यामुळे त्वचेला ओलावा मिळेल.

३. प्रस्तुतीनंतर शरीरातील वेदना दूर होऊन आराम मिळेल. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर मजबूत होते. तिळाचे तेल (Oil) त्वचेवर लावल्यास आराम मिळतो.

४. तसेच प्रस्तुती पूर्व किंवा नंतर आपण त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकतो.

अशाप्रकारे गर्भावस्थेत त्वचेची काळजी महिला घेऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT