दिवाळीची सुट्टी प्रत्येकाला मिळते. दिवाळीत PG किंवा हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी तसेच अनेक व्यक्ती घरी जातात. काही जण गावी जातात. घरापासून दूर कुठेतरी रहायला गेल्यावर आपण घरातील सर्व वस्तू सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे घराबाहेर असलेली झाडे खराब होतात. झाडे खराब झाल्यावर काय करावे असा प्रश्न आपल्या मनात येतो.
झाडांना जगण्यासाठी पाणी आणि ऊन दोन्हीची गरज असते. तुम्ही ८ दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तर झाडांना पाणी मिळत नाही. अशावेळी झाडे कमजोर होतात. तसेच सुकून खराब होतात. त्यामुळे असे होऊ नये म्हणून काय करावे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
झाडांना सूर्यप्रकाशाची फार गरज असते. सूर्यप्रकाशाच्या मदतीनेच झाडांची पाने आपलं अन्न तयार करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जाता तेव्हा झाडांची जागा बदला. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश लागतो. तर काही झाडांना अगदी कमी सूर्यप्रकाश देखील पुरेसा असतो. त्यामुळे ज्या झाडाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते त्याला त्या ठिकाणी ठेवा. तसेच ज्या झाडाला कमी सूर्यप्रकाशाची गरज असते त्याला सावलीच्या ठिकाणी ठेवा.
तुम्ही आठवडाभरासाठी बाहेर जाणार असला तर अशावेळी एका प्लास्टीकच्या बॉटलने तुम्ही झाडांना पाणी देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बॉटलमध्ये पाणी भरून ती बॉटल झाडावर एका ठिकाणी अडकवून ठेवली पाहिजे. तसेच या बॉटलच्या झाकनाला एक छिद्र करा. छिद्रातून रोज थेंब थेंब पाणी पडेल आणि झाडाला तुम्ही घरी नसताना देखील पाणी मिळेल.
झाडांना पाणी घालणे शक्य नसेल तेव्हा झाडं किंमान ५ दिवस तरी पाण्याशिवाय रहावं यासाठी त्याची माती जास्तीत जास्त वेळ कशी चांगली राहील याची काळजी घ्या. त्यासाठी मातीत नारळाच्या करवंट्या सोलून टाका. नारळाच्या करवंट्या आणि साली भिजवून घ्या. याने माती देखील जास्त काळ नरम राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.