ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरात आपल्याला तुळशीचे रोप दिसून येते. मात्र उन्हाळ्यात कडक उन्हामुळे तुळशीचे रोप सुकते.
चला तर पाहूयात उन्हाळ्यात तुळशीचे रोप सुकण्यापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
तुळशीत कच्चे दुध घालावे जेणेकरुन मातीतला ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
तुळशीचे रोप लावताना लाल किंवा रेताड मातीत लावावे जेणे करुन मुळांपाशी पाणी साचून राहत नाही आणि मुळं कुजत नाही.
तुळशीच्या रोपाती आठवड्यातून २ छाटणी करावी जेणे करून नवीन मंजिऱ्या येत राहून तुळस टवटवित राहिल.
तुळशीच्या रोपात मुरेल इतक्याच प्रमाणात पाणी टाकावे.
तुळशीच्या रोपाला साधारण ५-७ तासांच्या उन्हाची गरज असते त्यामुळे सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा जागी तुळस ठेवा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही