Shraddha Thik
पारिजातच्या पानात अनेक औषधी गुणधर्म असतात. या पानांचे सेवन केल्याने शरीराशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
तुम्हाला छातीत कफचा त्रास होत असेल तर पारिजातच्या पानांचे सेवन करू शकता.
पारिजात पानामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-बॅक्टेरियल असते. अशा वेळी याच्या पानांपासून बनवलेला काढा प्यायल्याने शरीराशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
खोकला आणि सर्दीपासून आराम मिळविण्यासाठी, आपण पारिजातच्या पानांचा एक काढा बनवा.
यासाठी सर्वप्रथम पारिजाताची काही पाने धुवून बारीक करून घ्यावीत. पुढे, एक कप पाणी गरम ठेवा.
पाण्याला उकळी आली की त्यात पारिजातची पाने टाकून थोडा वेळ उकळवा. आता ते एका कपमध्ये गाळून प्या.
पारिजाताच्या पानांचा काढा दिवसातून एकदा किंवा दोनदाच प्या, त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका अन्यथा हानिकारक ठरू शकते.