how to care makeup brush, Skin Care Tips in Marathi, Beauty Tips in Marathi
how to care makeup brush, Skin Care Tips in Marathi, Beauty Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

ब्युटी उत्पादनातील मेकअप ब्रशची काळजी कशी घ्याल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : त्वचा उजळवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. त्यातील एक मेकअप. सुंदर दिसणे कोणाला आवडणार नाही. ते सर्वांना आवडते. (Beauty Tips in Marathi)

हे देखील पहा -

मेकअप हा महिलांच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या सौंदर्यांत आणखी भर पडते परंतु, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मेकअप त्वचेसाठीही हानिकारक ठरू शकतो. जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपल्याला मेकअपसोबतच मेकअप ब्रशच्या स्वच्छतेचीही (Clean) विशेष काळजी (Care) घेणे गरजेचे आहे. मेकअपच्या नुकसानीपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी, आठवड्यातून एकदा ब्रश साफ करणे खूप महत्वाचे आहे. (How to care makeup brush)

मेकअप ब्रश साफ करण्यासाठी काही टिप्स

१. मेकअप ब्रश काही दिवस वापरल्यानंतर ते तेलकट होऊ लागतात. मेकअप ब्रश साफ करण्यासाठी आपण अँटी-बॅक्टेरियल वॉशिंग लिक्विडमुळे ब्रशवरील तेल सहज काढू शकतो. यासाठी कोमट पाण्यात अँटी-बॅक्टेरियल वॉशिंग लिक्विड मिसळून ब्रश भिजवत ठेवा व थोड्या वेळाने ब्रश बाहेर काढून स्वच्छ पाण्याने (Water) धुवा.

२. अनेकदा मेकअप आर्टिस्ट ब्रश स्वच्छ करण्यासाठी कोणतेही द्रव वापरत नाहीत. यासाठी नो रिन्स लिक्विडमधे ब्रशचा वरचा भाग बुडवा. टिश्यू पेपर किंवा टॉवेलवर ब्रश फिरवून स्वच्छ करु शकता.

३. आपली त्वचा संवेदनशील असल्यास, ब्रश स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल-आधारित द्रव टाळा. याचे त्वचेवर अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. तसेच, आपण साबणाने ब्रश घासून स्वच्छ पाण्याने धुवू शकतो. याने आपला ब्रशही स्वच्छ होईल आणि त्वचेवर कोणतीही प्रतिक्रिया येण्याची भीती राहणार नाही

४. मेकअप ब्रशे स्वच्छ करण्यासाठी आपण शॅम्पू देखील वापरू शकतो. यासाठी कोमट पाण्यात शॅम्पू टाकून ब्रश बुडवा व ५-१० मिनिटांनी ब्रश काढून स्वच्छ पाण्याने धुवा. याने आपला मेकअप ब्रश पूर्णपणे स्वच्छ होईल.

अशाप्रकारे आपण मेकअप ब्रश साफ करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT