Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ?
Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ? Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिवाळ्यातील केसांची काळजी घेण्याच्या टिप्स: केसांची योग्य काळजी घेणे हे सोपे काम नाही. हिवाळ्यात थंडीमुळे केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मुख्यतः केसांना खाज येणे, केस कोरडे पडणे अश्या समस्या उद्भवतात. कधीकधी काहीजणांचे हिवाळ्यात केस निर्जीव होतात. हिवाळ्यात केस गरम पाण्याने धुवू नये याची सर्वांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही हिवाळ्यात केस गळण्याच्या आणि कोरड्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता.

कोमट गरम तेलाची मालिश-

मऊ केसांसाठी गरम तेल खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात केसांना कोमट गरम तेलाने मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळते ते मऊ होतात आणि यामुळे केस तुटणार नाहीत. कोमट तेलात एलोवेरा जेल मिसळून त्याची मालिश करा. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळते.

गरम पाण्याने केस धुवू नका-

थंडीच्या ऋतूत लोक गरम पाण्याने केस धुतात. तुम्ही हे करण्यापासून पूर्णपणे दूर राहा. गरम पाणी हे केसांमधला ओलावा काढून टाकते ज्यामुळे ते कोरडे आणि निर्जीव बनतात. तुम्ही तुमचे केस फक्त थंड किंवा जरा कोमट पाण्याने धुवा.

केस मोकळे सोडू नका-

हिवाळ्यात केस मोकळे सोडू नका. त्यामुळे केसांची आर्द्रता कमी होते. तुम्ही कुठेही बाहेर जाल, फक्त केस बांधा. परंतु धुतलेले ओले केस घट्ट बांधण्याची चूक करू नका.

ओले केस बांधू नका

हिवाळ्यात केस ओले न बांधण्याची विशेष काळजी घ्या. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. यासोबतच ओले केस सुकवण्यासाठी कॉटन टॉवेल किंवा कॉटनचा टी-शर्ट वापरा. तसेच केस पुसताना सौम्यतेने पुसा. केसांवर टॉवेल झटकून केस सुकवू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत; संजय राऊत

RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?

Orange Side Effect: संत्री कोणी खाऊ नये?

Delhi Liquor Policy Scam: अरविंद केंजरीवाल यांच्याविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट

Aditi Rao Hydari : तुझ्या घायाळ नजरेने माझं काळीज जिंकलं

SCROLL FOR NEXT