Best Weekend Ideas Saam News Digital
लाईफस्टाईल

Top 10 Weekend Ideas: आजची सुट्टी कशी घालवायची, सुचत नाही? हे घ्या १० मस्त आयडियाज

Top 10 Weekend Ideas: अनेकदा असं होतं की, सुट्टीचा अख्खा दिवस निघून जातो, पण आपला कसलाच प्लॅन काही ठरत नाही आणि मग तो सुट्टीचा दिवस असाच वाया जातो.

साम टिव्ही

आठवड्यातले पाच-सहा दिवस आपण सतत काम करतो. आपल्या ऑफिसच्या व्यापात आपलं स्वतःकडे लक्षचं जात नाही. त्यामुळे सुट्टीचा दिवस आपल्याला हवाहवासा वाटत असतो, जेणेकरुन आपण आठवड्यातले एक-दोन दिवस तरी स्वतःला देऊ शकतो. मात्र अनेकदा असं होतं की, सुट्टीचा (Holiday) अख्खा दिवस निघून जातो, पण आपला कसलाच प्लॅन काही ठरत नाही आणि मग तो सुट्टीचा दिवस असाच वाया जातो. दुसऱ्या दिवशी आपल्याला काही ना काही आठवतं. सुट्टीचा दिवस वाया जाऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशी काय करावं याबद्दल आम्ही तुम्हाला काही आयडियाज देणार आहोत. (10 Best Weekend Ideas In Marathi)

हे देखील पहा -

खरंतर आपापल्या प्रायोरिटीजनुसार सुट्टीच्या दिवशी काय करायचं हे ठरवायला हंव. काहींना शनिवार (Saturday) किंवा रविवार (Sunday) या दोघांपैकी एकच सुट्टी असते, तर काहींना शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या असतात तर काहींना शनिवार आणि रविवार वगळता इतर वर्किंग डेजमध्ये सुट्टी असते. अशा वेळेस आपण आपल्या सुट्टीचे प्लॅनिंग तासांमध्ये विभागले पाहिजे. एक दिवस सुट्टी असेल तर २४ तास आणि दोन दिवस सुट्टी असेल कर ४८ तासांचं प्लॅनिंग करावं. आदल्या दिवशी प्लॅनिंग केलेलं कधीही चांगलं.

१) काहीच करु नका: होय! जर तुम्ही कामाने जास्तच तणावात असेल तर काहिच करु नका. सुट्टीच्या दिवशी आराम करा आणि रिलॅक्स व्हा. स्वतःला वेळ द्या, आरशात बघा, स्वतःशीच बातचीत करा आणि मस्त झोप घ्या. याने तुमचा थकवा आणि तणाव नक्कीच कमी होईल.

२) फॅमिलीसोबत वेळ घालवा: कामाच्या व्यापात अनेकदा आपलं आपल्या घरातील लोकांशी, परिवाराशी नीट बोलणं होत नाही, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आपल्या परिवारातील सदस्यांशी मनमोकळ्या गप्पा मारा, डिनर करा याने तुम्ही तुमच्या परिवाराशी कनेक्टेड राहाल.

३) फिरायला जा: तेच-तेच रुटीन फॉलो करुन माणसाला कंटाळा येतो, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मस्त फिरायला जा, लॉंग ड्राईव्ह किंवा ट्रेकिंगला जा. यामुळे आपल्यातील आळसपणा निघून जातो आणि मन प्रसन्न होते. मन प्रसन्न असेल तर दुसऱ्या दिवशी कामही चांगलं होतं.

४) मनोरंजन: जर का फिरायला शक्य नसेल तर एखाद्या मुव्हीला जा, किंवा नाटकाला अथवा स्टॅंडअप कॉमेडी शो अटेंड करा. चांगले आणि मोटिव्हेशनल मुव्हीज बघा, नाहीतर धमाकेदार कॉमेडी शोज् बघा आणि मनोरंजनाचा आनंद घ्या.

५) खेळ खेळा: जर का तुम्ही स्पोर्ट्स लव्हर असाल तर सुट्टीच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेट मॅच, बॅडमिंटन, सायकलिंग अथवा इतर अन्य तुमच्या आवडीचे खेळ खेळू शकता.

६) छंद जोपासा: तुम्हाला कोणताही छंद असेल जसे, लिखाण, गाणे, डान्सिंग, पेंटींग, वाचन असे अनेक छंद तुम्ही सुट्टीच्या दिवशी पुर्ण करु शकता. छंद जोपासल्याने आपल्यातील कलाकार जिवंत राहतो, त्याला जिवंतचं ठेवा.

७) राहिलेली कामं करुन घ्या: सुट्टीचा उपयोग डॅमेज कंट्रोल किंवा पेंडींग वर्क पुर्ण करण्यासाठीही केलेला कधीही चांगलं. जेणेकरुन कामाच्या दिवशी तुमच्यावर जास्त लोड येणार नाही आणि कामात सुसुत्रता येईल.

८) नवं काहीतरी शिका: सुट्टीच्या दिवशी नवं काही शिकण्यासाठी चार-पाच तासांचे ऑनलाईन कोर्स पुर्ण करु शकता. तुमच्या कामाशी संबंधीत सर्टिफिकेट कोर्स करु शकता. याचा फायदा तुम्हाला तुमच्या कामात होईल. लक्षात ठेवा शिकलेलं कधीही वाया जात नाही.

९) शॉपिंग करा: शॉपिंग करणं कुणाला आवडत नाही. सुट्टीच्या दिवशी आपल्या गरजेच्या वस्तू किंवा आवडीच्या वस्तू विकत घ्या. पण शॉपिंग करताना खिशाचंही भान ठेवा. नाहीतर गडबड झालीच म्हणून समजा.

१०) मित्रांना फोन करा: वरील एवढ्या सगळ्या गोष्टी करुन दमला असाल तर जरा ब्रेक घ्या आणि आपल्या जिवलग मित्रांना थेट फोन लावा, व्हिडिओ कॉल केला तर भारीच! जुनी माणसं, आपली माणसं यांची विचापुस करा. गावाकडं फोन लावा. सगळ्यांशी कनेक्टेड व्हा. याने लोकं आपलीही विचारपुस करतील आणि आपले नाते-संबंध आणखीन दृढ होतील.

तर कशा वाटल्या तुम्हाला आमच्या वीकेंडच्या या दहा आयडियाज् हे नक्की सांगा. आवडल्यास आपल्या मित्रांनाही या भन्नाट आयडिया सांगा. Have a Great Day!

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT