chapati saam tv
लाईफस्टाईल

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Kitchen tips: गव्हाचं पीठ भिजवताना ते हाताला चिकटतं आणि हात खराब होतात. आज आम्ही तुम्हाला हात न खराब करता कणीक भिजवण्याची एक ट्रिक सांगणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या दररोजच्या जेवणात चपाती ही असतेच. गव्हाच्या पीठापासून बनलेली चपाती तुमच्या आरोग्यासाठी देखील उत्तम असते. काहींना चपाती करायचा कंटाळा येतो. याचं कारण म्हणजे कणीक भिजवण्याचा अनेकांना कंटाळा येतो. गव्हाचं पीठ भिजवताना ते हाताला चिकटतं आणि हात खराब होतात. मात्र जर तुम्ही हात न खराब करता मळू शकणार असाल तर.

आज आम्ही तुम्हाला हात न खराब करता कणीक भिजवण्याची एक ट्रिक सांगणार आहोत. पीठ भिजवणं म्हणजे कंटाळवाणं काम. एकदा किचनमध्ये गेल्यानंतर काम करून करून घामाघूम व्हायला होतं शिवाय हात आणि कपडे देखील खराब होतात.

अनेकांना कणीक मळताना पाण्याचा अंदाज येत नाही. यावेळी पाण्याचा अंदाज चुकल्याने पीठ जास्त सैल किंवा घट्ट होतं. यामुळे हात अधिकच खराब होतात. चला जाणून घेऊया हाताला खराब न करता मऊ पीठ मळण्यासाठी सोपी ट्रिक. ही ट्रिक वापरल्यास तुमचं पीठ मळण्याचं काम अधिक सोपं होणार आहे.

हाताला पीठ न लावता कसं भिजवाल कणीक

यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकची पिशवी लागणार आहे. यावेळी एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये थोडं पाणी घाला. या पाण्यात थोडंस पीठ घालून कणीक मळून घ्या. सुरूवातीला पीठ पिशवीला चिकटू शकतं. मात्र पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर ते पिशवीला चिकटणार नाही.

ही प्रक्रिया झाल्यानंतर पिशवी काढून पीठ हातानं मळून एकजीव करून घ्या. पिशवी काढण्याआधी पीठ व्यवस्थित एकजीव झालंय का हे पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Election: तिकीट मिळाले नाही म्हणून ढसाढसा रडले, कपडे फाडून रस्त्यावर लोळले; RJD नेत्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT