Scissors Tips Saam TV
लाईफस्टाईल

Scissors Tips : घरच्याघरी कैचीला धार कशी लावायची? करा 'हा' जादूई उपाय

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या घरात चाकू आणि कैची असतातच. विविध वस्तू कापण्यासाठी आपण कैचीचा वापर करतो. कैचीचा जास्त वापर केल्याने काही दिवसांत कैचीची धार कमी होते. त्याने कोणतीही वस्तू कापली जात नाही. त्यामुळे कैचीला पुन्हा धार लावण्यासाठी दुकानात न्यावी लागते. कैचीला धार लावण्याची दुकाने मोजक्याच ठिकाणी आहेत. त्यामुळेच आज आम्ही घरच्याघरी कैचीला धार कशी लावायची याची माहिती सांगणार आहोत.

कैचीला घरच्याघरी धार लावणे अगदी सोप्पं आहे. ज्या व्यक्तींकडे घरात शिलाई मशीन आहे त्यांच्याकडे मोठी कौची असतेच. मोठ्या कैचीने कापड कापून त्याची धार लवकर जाते. त्यामुळे याला धार लावण्यासाठी तुमच्या घरात असलेली शिलाई मशीन तुम्हाला मदत करेल. त्यासाठी शिलाई मशीन सुरू करा.

शिलाई मशीनवर असलेल्या चाकाला एक सेलोटेप लावून घ्या. हा टेप दोन्ही बाजूने चिकटणारा असावा. पुढे यावरील एका बाजूला असलेली चिकटपट्टी काढून घ्या. तसेच यावर पॉलिश पेपर लावून घ्या. पॉलिश पेपर या चाकावर अगदी सर्व बाजूने लावून घ्या. त्यानंतर मशीन सुरू करा आणि कैचीला चाकावर फिरवून त्याला धार लावून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही घरच्याघरी कैचीला धार लावू शकता.

शिवण कामातील कैचीला धार लावणाऱ्या हॅकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @aaripainuly19 या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या महिलेने स्वतः कैचीला धार लावून दाखवली आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यानी देखील अनेक कमेंट केल्यात. कैची प्रमाणे तुम्ही घरातील सुरी किंवा चाकू यांना सुद्धा अशी धार लावू शकता. याचा आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही घरात असलेला पाटा किंवा वरवंटा यावर सुद्धा घरच्याघरी चाकुला धार लावू शकता. किचनमधील या काही सिंपल आणि सोप्या टिप्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

Team India Announced: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

Maharashtra Politics: दादांना हवं फिरतं मुख्यमंत्रिपद? सीएमपदासाठी अजित पवार यांची अमित शहांना गळ?

Election commission PC : राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT