Two Wheeler Selling Saam tv
लाईफस्टाईल

Two Wheeler Selling : बाईक विकताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पडेल महागात

Second Hand bikes in India : काही कारणांमुळे आपण बाईक विकण्याचा विचार करत असू तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

How To Sell Two Wheeler : हल्ली प्रत्येकजण बाईक नाहीतर कार वापरतो. शहरात तर या अधिक प्रमाणात दिसून येतात. परंतु, काही कारणांमुळे आपण बाईक विकण्याचा विचार करत असू तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला तुमची बाईक चांगल्या किमतीत विकायची असेल, तर तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठी सर्वात आधी तुमची बाईक पूर्णपणे स्वच्छ करा. तसेच ती योग्य प्रकारे काम करते का हे देखील तपासा. जाणून घेऊया बाईक विकताना काय काळजी घ्यायला हवी.

1. योग्य खरेदीदार शोधा

तुमची बाईक (Bike) योग्य व्यक्तीला विकणे आणि ती चांगल्या किमतीत विकणे हे सर्वात मोठे काम आहे. कारण अनेक वेळा लोक बाईक विकत घेतात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा खरेदीदार चांगला आहे की नाही हे निवडावे लागेल. तुम्ही तुमची बाईक एखाद्या डीलरला किंवा ग्राहकाला विकू शकता जो वापरलेली बाईक खरेदी (Buy) करण्याचा विचार करत असेल. एवढेच नाही तर फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीला बाईक विकत आहात त्याची संपूर्ण माहिती शोधली पाहिजे.

2. कागदपत्रांबाबत निष्काळजीपणा नको

अनेकजण बाईक विकताना कागदपत्रे बनवत नाही. जर तुम्ही बाईक विकण्याचा विचार करत असाल तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या. यासाठी सर्व कागदपत्रे (Documents) सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाईक विकताना कोणतीही अडचण येऊ नये. या प्रकरणात, आपण बाईक मालकीचे प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विक्री करार आणि इतर काही कागदपत्रे देखील जवळ ठेवावीत.

3. दुचाकीसाठी विमा हस्तांतरित करा

बाईकचा विमा खरेदी केल्याच्या 14 दिवसांच्या आत हस्तांतरित करणे आवश्यक आहे. वाहनाच्या विमा कंपनीला विक्रीबाबत माहिती द्यावी. त्यानंतर तुमची बाईक ही दुसऱ्याच्या नावावर केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वाठी आधार कार्ड ग्राह धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT