Home cleaning tips in marathi
Home cleaning tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Cleaning Tips : वॉश बेसिनमधले हट्टी डाग कसे काढाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : घरातील हे प्रत्येक ठिकाण गृहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. त्यातली एक जरी वस्तू अस्ताव्यस्त किंवा अस्वच्छ असली की, त्यांना करमत नाही. घराच्या (Home) मजल्यावरील बाथरूम आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छ वॉश बेसिन देखील चमकताना दिसतात तेव्हा घराची स्वच्छता पूर्ण मानली जाते. खरेतर, वॉश बेसिनचा वापर भांडी घासण्यासाठी किंवा चेहरा साफ करण्यासाठी करतो. अशावेळी साबणाचे डाग अनेकवेळा त्यावर राहतात, जे जास्त वेळ साफ न केल्यास तिथेच घाण साचून राहाते व ती स्वच्छ (Clean) करणे खूप कठीण होते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला वॉश बेसिनवर साचलेली घाण तुम्ही सहज कशी साफ करू शकता ते सांगू.

हे देखील पहा -

वॉश बेसिन अशा प्रकारे स्वच्छ ठेवा

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर -

बेकिंग सोडा एक क्लिनिंग एजंट आहे ज्याच्या मदतीने आपण सिंक सहज साफ करू शकतो. वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची पेस्ट तयार करा आणि स्पंजच्या मदतीने वॉश बेसिनवर लावा. १५ मिनिटांनंतर पाण्याने (Water) धुवा.

२. व्हिनेगर आणि डिश डिटर्जंट -

स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर, पाणी आणि डिश डिटर्जंट मिक्स करा. वॉश बेसिनवर स्प्रे करा. १५ मिनिटांनंतर, स्क्रब ब्रशने वॉश बेसिन स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

३. लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही तुमचे वॉश बेसिन उजळवू शकता. वॉश बेसिनमध्ये फक्त बेकिंग सोडा पसरवून घ्या. यानंतर वॉश बेसिन लिंबाच्या मदतीने ५ मिनिटे ते चांगले घासून घ्या. यानंतर वॉश बेसिन पाण्याने स्वच्छ करा.

आपण जर बेसिन रोज स्वच्छ केली तर हट्टी डाग दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे दररोज काही मिनिटे काढून आपल्या घरातील सर्व वॉश बेसिन स्वच्छ करण्याची सवय लावायला हवी.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske News | नवी मुंबईपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी

Viral Video: युट्यूबरची भेटवस्तू पाहून गरीब मुलीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

SCROLL FOR NEXT