Android Security Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Android Security Tips: अँड्रॉईड फोनमधून मालवेअर आणि व्हायरस हटवण्यासाठी 'हे' करा...

Tech Tips: how to clean your Android phone from virus याशिवाय फोनमधील सर्व ॲप्स सतत अपडेटेड ठेवा आणि फोनलाही सिक्युरीटी अपडेट येतात तेही सतत अपडेट ठेवा आणि सुरक्षित रहा.

साम टिव्ही

तुमच्या मोबाईलची (Android Mobile) बॅटरी लवकर संपतेय का? तुमच्या मोबाईलचा डेटा गरजेपेक्षा जास्त लवकर संपतोय का? याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे. कारण, तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस (Virus) किंवा मालवेअर (Malware) असण्याची दाट शक्यता आहे. तुमचा मोबाईल स्लो झाला असेल, गरम होत असेल, वापराविना मोबाईलचा डेटा (Mobile Data) पटकन संपत असेल तर तुमचा मोबाईल हॅक (Hack) झालेला असू शकतो किंवा त्यात व्हायरस अथवा मालवेअर असू शकतो. पण, घाबरु नका. आम्ही यासाठी तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात... (Do this to remove malware and viruses from Android phones)

हे देखील पहा -

स्टेप १: अन ऑफिशियल अनइन्स्टॉल करा

गुगल डिव्हाईसाठी सर्व अधिकृत ॲप हे केवळ अँड्रॉइड (Android) ॲप स्टोअर (Play Store) मधूनच डाऊनलोड करावेत, इतर ॲप्स स्टोअरमधील ॲप्समध्ये व्हायरस अथवा मालवेअर असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असे अॅप्स त्वरित अन इन्स्टॉल करावेत.

स्टेप २: फॅक्टरी डाटा रिसेट

फॅक्टरी डाटा रिसेट म्हणजे संपुर्ण मोबाईल फॉरमेट करणं. यात मोबाईलच्या इंटरनल मेमरीमध्ये असणारा सगळा डेटा डिलीट होतो, ज्यामुळे फोनमधील व्हायरस आणि मालवेअर्स सुद्धा डिलीट होतात. पण, फॉरमॅट करायच्या अगोदर तुमचा डेटा दुसरीकडे बॅकअप करुन घ्या.

स्टेप ३: सेफ मोड ऑन करा

मोबाईलमध्ये अनेक थर्ड पार्टी आणि लपलेले ॲप्स असू शकतात. सेफ मोड चालू केल्याने हे थर्ड पार्टी ॲप्स डिसेबल म्हणाजे निष्क्रीय होतात ज्यामुळे फोनमधील थर्ड पार्टी ॲप्स व्हेरिफाय करुन ते डिलीट करता येतात.

अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमधून व्हायरस आणि मालवेअर हटवता येतील. याशिवाय फोनमधील सर्व ॲप्स सतत अपडेटेड (Mobile Tech News) ठेवा आणि फोनलाही सिक्युरीटी अपडेट येतात तेही सतत अपडेट ठेवा आणि सुरक्षित रहा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT