Recover Deleted Photos Saam Tv
लाईफस्टाईल

Recover Deleted Photos : एका क्लिकवर मिळवा फोनमधील डिलीट झालेले महत्त्वाचे फोटो अन् व्हिडिओ, वाचा सविस्तर

Android Tips And Tricks : स्मार्टफोन फोटोग्राफीचे दोन सर्वात मोठे फायदे म्हणजे फोटो फोनवरच सहज साठवता येतात आणि गरज पडल्यास इतरांसोबत शेअरही करता येतात.

Shraddha Thik

How To Recover Deleted Photos In Android Smartphones :

सध्याच्या स्मार्ट जगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनचा वापर कॉलिंग, मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी होत असला, तरी सोशल मीडियाच्या जमान्यात आता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. स्मार्टफोन फोटोग्राफीचे दोन सर्वात मोठे फायदे म्हणजे फोटो फोनवरच सहज साठवता येतात आणि गरज पडल्यास इतरांसोबत शेअरही करता येतात.

मात्र, काही वेळा कमी स्टोरेजमुळे फोटो आणि इतर कागदपत्रे (Documents) डिलीट करावी लागतात. पण अनेकदा असे घडते की चुकून दुसरेच कोणते तरी फोटो आणि व्हिडिओ डिलीट होतात. तुमच्यासोबतही असे वारंवार होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला काही अशा पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही डिलीट केलेले फोटो सहज रिकव्हर करू शकता.

Google Android स्मार्टफोन (Smartphone) एक फोल्डर देतो ज्यामध्ये हटवलेले फोटो संग्रहित केले जातात. जर तुमच्याकडून एखादा फोटो डिलीट केला गेला, तर तुम्ही ते येथून सहज पुन्हा मिळवू शकतो, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही या फोल्डरमधून फक्त 30 दिवसांच्या आत फोटो पुन्हा मिळवू शकता.

जेव्हा तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनमधील कोणताही फोटो किंवा कागदपत्र डिलीट करता. तेव्हा तो फोटो रिसायकल बिन फोटोमध्ये ट्रान्सफर होतो. यावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट रीसायकल बिन फोल्डरवर पोहोचाल. येथे तुम्हाला ते सर्व फोटो आणि कागदपत्र सापडतील जे गेल्या 30 दिवसांत डिलीट केले आहेत.

जर तुम्हाला फोटो (Photo) रिकव्हर करायचा असेल तर तुम्हाला त्यावर जास्त वेळ दाबून ठेवावे लागेल. यानंतर तुम्हाला रिस्टोअर आणि परमनंट डिलीटचा पर्याय मिळेल. रिस्टोर पर्यायावर क्लिक करून तुम्ही फोटो रिकव्हर करू शकता. पुन्हा मिळवण्यासाठी, आपल्याला फोटो त्याच फोल्डरमध्ये सापडेल जिथे तो पूर्वी होता.

अँड्रॉइड वापरकर्ते या प्रक्रियेद्वारे हटविलेले फोटो सहजपणे मिळवू शकतात. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जर तुम्ही रीसायकल बिनमधून एखादा फोटो डिलीट केला तर तुम्ही तो रिकव्हर करू शकणार नाही. रीसायकल बिनमधून डिलीट केलेले फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा सहारा घ्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT