Diabetes Control Tips
Diabetes Control Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Control Tips : वाढलेलं बल्ड शुगर कसे ओळखाल ? शरीर देते 'हे' 6 महत्त्वाचे संकेत!

कोमल दामुद्रे

Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्या लोकांना नेहमी त्यांचे ब्लड शुगर लेवल चेक केले पाहिजे. ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणे फार गरजेचे आहे. झोपेत अडचण येणे, दृष्टी धुसर होणे, सतत तहान लागणे हे ब्लड शुगर लेवल वाढण्याचे काही लक्षणे आहे.ज्यांना मधुमेह आहे त्याने आहार व्यवस्थित वेळेवर घेतला पाहिजे.

जर मधुमेह रुग्णांनी खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांचा ब्लड शुगर लेवल वाढू शकतो. ब्लड शुगर वाढल्याने शरीर काही संकेत देते वजन कमी होणे,सारखी तहान लागणे, घसा कोरडा पडणे असे लक्षण दिसत असल्यास त्वरित ब्लड शुगर लेव्हल चेक केले पाहिजे.

साधारण 140 mg/dl ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल आहे. जर 200mg/dl झाले तर तुमचा ब्लड शुगर वाढला आहे आणि 300 mg/dl पेक्षा जास्त ब्लड शुगर लेव्हल गेला असेल ते खूप भयंकर लेव्हल वाढलेला आहे. नियमितपणे ब्लड शुगर चेक केलाच पाहिजे. जाणून घेऊया त्याची लक्षणे

1. पायावर होणारी लक्षणे

पाय सुन्न पडतात जर कोणी काही टोचले मारले तरी जाणवत नाही.पायापर्यंत रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो त्यामुळे पाय सुन्न पडतात.अशा समस्या येत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

2. किडनीवर वाईट परिणाम

मधुमेह किडनीवर (Kidney) परिणाम करते त्यामुळे सतत लघवीला येणे अशी लक्षणे दिसतात. किडनी हा शरीरातील महत्वाचा ऑर्गन आहे. नको असलेले पदार्थ चाळण्याचे काम किडनी करत असते यात लहान रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्यावर ब्लड शुगर लेव्हलचा परिणाम होतो.

3. डोळ्यांवर परिणाम

वाढलेल्या ब्लड शुगर लेव्हलचा परिणाम डोळ्यांवर (Eye) होतो.त्यामुळे समोरच स्पष्ट दिसण्यास अडथळा निर्माण होतो आणि सर्व धुसर दिसते.बऱ्याच वेळा डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची वेळ येते तेव्हाच तुम्ही स्पष्ट पाहू शकता याचे कारण म्हणजे तुमचे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल मध्ये नाही.

4. मधुमेहाचा मज्जातंतूंवर होणारा परिणाम

डायबेटिक रेटिनोपॅथी आणि नेफ्रोपॅथी प्रमाणे, उच्च रक्तातील साखरेमुळे देखील मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. या स्थितीत, पीडित व्यक्तीच्या शरीरात सुन्नपणा येतो आणि वेदना, तापमान, जळजळ, उबळ आणि स्पर्श जाणवण्याची क्षमता कमी होते. याशिवाय व्यक्तीच्या पायात अल्सर आणि इन्फेक्शन सारखी लक्षणेही दिसतात.

5. हृदय व रक्तवाहिन्यांवरही परिणाम

मधुमेह (Diabetes) हा रक्तातील साखर वाढवणारा आजार असल्याने त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. या कारणामुळे मधुमेहाच्या रुग्णाला स्ट्रोक आणि हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका नेहमीच असतो. याव्यतिरिक्त, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांना उच्च रक्तदाबासह हृदयविकाराचा धोका (Heart-attack) वाढवणाऱ्या अनेक आजारांचा धोका असतो.

6. हिरड्या रोग

हिरड्यांचा रोग ही उच्च रक्तातील साखरेशी (Sugar) संबंधित एक सामान्य स्थिती आहे ज्याला पीरियडॉन्टल रोग देखील म्हणतात. हे सामान्यतः रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा घट्ट होण्यामुळे होते, ज्यामुळे हिरड्यांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. या व्यतिरिक्त, उच्च रक्त शर्करा देखील तोंडात बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते ज्यामुळे सामान्यतः हिरड्यांचे आजार होतात. त्याच्या लक्षणांमध्ये (Symptoms) हिरड्यांमधून रक्त येणे, त्यांची संवेदनशीलता आणि हिरड्या दुखणे यांचा समावेश होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

SCROLL FOR NEXT