Sakshi Sunil Jadhav
आजकाल केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या तरुणांपासून वयस्कांपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.
तणाव, चुकीचा आहार, प्रदूषण आणि हार्मोन्समधील बदल यामुळे केसांची वाढ कमी होते आणि टक्कल पडण्याची शक्यता वाढते.
कांद्यामध्ये असलेला सल्फर केसांच्या मुळांना पोषण देतो. आठवड्यातून २ वेळा कांद्याचा रस लावल्यास केस गळणे कमी होते.
मेथी भिजवून पेस्ट तयार करून टाळूवर लावल्याने केस मजबूत होतात आणि वाढ सुधारते.
आवळा रस किंवा पावडर केसांना लावल्यानं केस गळणे कमी होते तसेच अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते.
गरम नारळाचे तेल मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना पोषण मिळते.
कोरफडीचे जेल टाळूला थंडावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते.