Heatstroke Saam Tv
लाईफस्टाईल

Heatstroke: उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा बचाव करावा? जाणून घ्या कारणे, लक्षणे अन् उपाय...

उष्णतेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो. पण नक्की उष्माघात म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय काय आहेत जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heatstroke: देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने आपला विक्रम मोडीत काढला आहे. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. देशातील अनेक भागात पारा ४५ अंशांवर पोहोचला असून उष्माघातापासून वाचण्यासाठी लोक अनेक मार्गांचा अवलंब करत आहेत. बर्‍याच जणांना खरोखरच उष्माघाताबद्दल नीट माहिती नसते. त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला उष्माघात म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि कोणत्या घरगुती उपायांनी उष्माघातापासून मुक्ती मिळू शकते याबद्दल प्राथमिक माहिती सांगणार आहोत.

उष्माघात म्हणजे काय? (What is heat stroke)

उष्माघात किंवा सन स्ट्रोक (Sun Stroke) याला सामान्यतः 'लू लागणे' असे म्हणतात. जेव्हा तुमचे शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. उष्माघातात शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि त्वरित ते कमी करता येत नाही. एखाद्याला उष्माघात झाला की व्यक्तीला शरीरात अजिबात घाम येत नाही. उष्माघातानंतर 10 ते 15 मिनिटांत शरीराचे तापमान 106°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मानवी मृत्यू किंवा अवयव निकामी होऊ शकतात.

उष्माघाताची लक्षणे काय ? (Symptoms of Heat Stroke)

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घ्यावा. त्यामुळे उष्माघाताची सर्व लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. ही आहेत लक्षणे-

  • डोकेदुखी

  • स्मृतिभ्रंश

  • उच्च ताप

  • शुद्ध हरवणे

  • मानसिक स्थितीत बिघाड

  • मळमळ आणि उलटी होणे

  • त्वचा लाल होणे

  • हृदयाची गती वाढणे

  • त्वचा मऊ होणे

  • त्वचा कोरडी पडणे

उष्माघाताची कारणे काय आहेत? (Causes of Heatstroke)

गरम वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. जर कोणी अचानक थंड वातावरणातून उष्ण ठिकाणी गेले तर त्याला उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघाताचे एक मुख्य कारण गरम हवामानात अति व्यायाम करणे हे देखील आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर पुरेसे पाणी न पिल्याने देखील याचा त्रास होऊ शकतो. जर कोणी जास्त प्रमाणात मद्यपान केले तर शरीराचे तापमान सुधारण्याची शक्ती कमी होते. हे देखील उष्माघाताचे कारण असू शकते. उन्हाळयात असे कपडे परिधान केले की ज्यातून घाम व हवा निघत नसेल तरीही उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाय;

एखाद्याला उष्माघाताचा झटका आला आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास अवयव निकामी होणे, मृत्यू होणे, मेंदू मृत होणे अश्या काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर एखाद्याला उष्माघात झाला असेल, तर लगेचच खालील पद्धतींचा अवलंब करावा-

  • उष्माघाताने त्रस्त असलेल्या व्यक्तीला आणखीन उन्हात ठेवू नका.

  • कपड्यांचा जाड थर काढा आणि हवा खेळती राहू द्या.

  • शरीर थंड करण्यासाठी कूलर किंवा पंख्यामध्ये बसवा/ बसा.

  • थंड पाण्याने आंघोळ करा.

  • थंड पाण्याच्या कपड्याने शरीर पुसा

  • डोक्यावर बर्फाचा पॅक किंवा कापड थंड पाण्याने ओले करून ठेवा.

  • थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल डोके, मान, कोपरा आणि कंबरेवर ठेवा.

या प्राथमिक उपायांनंतरही जर शरीराचे तापमान कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT