अनेकांनी आयुष्यात एकदा तरी शब्दकोडे सोडवले असेल. वृत्तपत्रांमध्ये शब्दकोड्यांना एक वेगळी जागा असायची. मेंदूला व्यायाम देणारा हा मनोरंजक खेळ म्हणून ओळखला जायचा. परंतु, कालातंराने याचे विश्व कमी होत गेले.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळतात. आज ही शब्दकोडी मुलांच्या ओळखीची राहिली नाहीत. परंतु, जर तुम्हाला मुलांना शब्दकोडी सोडवायला लावयची असतील. स्क्रीन टाईम वाढल्याने शब्दकोडी कुठेतरी लोप पावली आहेत. मात्र अनेकांना शब्दकोडी सोडवणे आजच्या डिजिटल जगातही तितकच आवडतं. मुलांना हुशार बनवयाचे असेल तर शब्दकोडी आता ऑनलाईन सोडवता येणार आहेत.
कशी असतील शब्दकोडी?
ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.
यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.
अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.