Traffic Challan Saam Tv
लाईफस्टाईल

E-Challan Online: नियम मोडला म्हणून तुम्हाला ई-चालान पाठवलाय का? माहित नसेल, तर जाणून घ्या एका क्लिकवर...

Traffic Challan: नियम मोडला म्हणून तुम्हाला ई-चालान पाठवलाय का? माहित नसेल, तर जाणून घ्या एका क्लिकवर...

साम टिव्ही ब्युरो

E-Challan Online: कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चालान कारवाई झाली आहे किंवा कसे, हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चालानचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चालान संदर्भात काही तक्रार असल्यास https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अपघात होणार नाहीत. रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असून, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात दर महिन्याला रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्याचे ठरविण्यात आले आहे.

प्रत्येक नागरिकाने जुने वापरते वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यावर झालेली ई-चालान कारवाई, ई-चालानचा भरणा झाल्या बाबतची माहिती, याची खात्री करावी. वाहन चालक ज्या रस्त्यावरून वाहन चालवित आहे, त्या रस्त्यावरील वेग मर्यादेची खात्री करून वाहनाची वेग मर्यादा पाळावी, अन्यथा ई चलन कारवाई होवू शकते. (Latest Marathi News)

वाहन चालवित असताना आपण नेहमी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहात याची दक्षता घ्यावी, असं असे आवाहनही गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. योग्य पद्धतीने सीट बेल्ट लावणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, लेनची शिस्त पाळणे यासारख्या बाबींचा अवलंब करावा, जेणेकरून ई-चलनाव्दारा होणारी कारवाई टाळता येईल. सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई महाराष्ट्र पोलीसांकडून करण्यात येत आहे.

तसेच महामार्ग सुरक्षा पथकाचे ट्विटर अकाउंट @HSPMaharashtra या नावाने चालू करण्यात आले असून, महामार्ग सुरक्षा पथकामार्फत #MahaRastaSuraksha, #MahaRoadSafety, #Highwaysafety या हॅशटॅगच्या माध्यमातून राज्यातील वाहतुकीबाबतच्या घडामोडीबाबतची माहिती दिली जात असल्याचे गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT