Veg Tikka Recipe  saam Tv
लाईफस्टाईल

Breakfast Recipe : बेसन आणि रव्यापासून बनवा टेस्टी व्हेज टिक्का, पाहा रेसिपी

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु तितकाच आरोग्यदायी आणि शरीराला फायदेशीर ठरेल हा विचार असतो. नाश्ता हा चविष्ट देखील असायला हवा. बेसन आणि रव्यापासून तुम्ही टेस्टी डिश बनवू शकता.

कोमल दामुद्रे

How To Make Veg Tikka :

सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु तितकाच आरोग्यदायी आणि शरीराला फायदेशीर ठरेल हा विचार असतो. नाश्ता हा चविष्ट देखील असायला हवा. बेसन आणि रव्यापासून तुम्ही टेस्टी डिश बनवू शकता.

तेलात तळलेले आणि शरीरासाठी अनहेल्दी पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहेत. तुम्ही विविध भाज्या मिसळून नाश्ता बनवलात तर मुले आवडीने खातील. पाहूया व्हेज टिक्का बनवण्याची रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • बेसन - ३/४ वाटी

  • रवा- १/४ वाटी

  • दही

  • लाल तिखट - १/४ वाटी

  • जिरेपूड - १/२ टीस्पून

  • हळद - १/२ चमचा

  • धणे पावडर - १/४ वाटी

  • ठेचलेली लाल तिखट

  • चाट मसाला- १/२ चमचा

  • पाणी (Water) - २ ते १/४ वाटी

  • चवीनुसार मीठ

  • फ्लॉवर बारीक चिरलेला

  • टोमॅटो बारीक चिरलेला

  • कांदा बारीक चिरलेला

  • कोथिंबीर

  • तेल (oil) दोन चमचे

  • आले-लसूण पेस्ट

  • हिरव्या मिरच्या- ५

  • हिंग

2. कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या. त्यात रवा आणि दही मिसळा.

  • तसेच लाल तिखट, जिरे, धणे पूड घाला. मीठ आणि हळद एकत्र मिसळा. त्यात ठेचलेली लाल मिरची आणि चाट मसाला घाला.

  • बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करा. फ्लॉवर, गाजर, कोबी, सिमला मिरची, गाजर, कांदा, टोमॅटो मिक्स करा. कोथिंबीर आणि कांदा घाला.

  • कढईत तेल गरम करून जिरे तडतडून घ्या, मोहरी घाला.

  • हिंग आणि आले लसूण पेस्ट घाला. पेस्टचा कच्चापणा निघून गेल्यावर बेसन आणि रवा यांचे मिश्रण घालून ढवळा. घट्ट होईपर्यंत ढवळा.

  • मिश्रण तव्याच्या बाजूला सोडताना. त्यामुळे थोडं तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून पसरवा.

  • थंड झाल्यानंतर चौकोनी आकारात कापून पॅनमध्ये बेक करा. चविष्ट व्हेज टिक्का तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT