South Indian Style Dosa : रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी हल्ली अनेकांच्या घरात बनतो तो डोसा. डोसा ही अनेकांचा आवडता पदार्थ. आपल्या भारतात असे अनेक पदार्थ आहेत त्याची चव आपण कधी तरी चाखलीच असेल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात आपण त्याला हमखास बनवण्याचे ट्राय करतो. परंतु, एकतर तो पदार्थ फसतो किंवा तो खालेल्या टेस्ट सारखा लागत नाही.
साउथ इंडियन हॉटेल किंवा अण्णाकडच्या टेस्ट सारखा आपला डोसा खरेतर बनत नाही. पण आज आम्ही तुम्हाला डाळ-तांदूळ न भिजवता १० मिनिटांत क्रिस्पी डोसा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घ्या त्याची रेसिपी
1. साहित्य
रवा- १ कप
मैदा - २ ते ३ चमचे
बेसन - १ चमचा
मीठ - आवश्यकतेनुसार
साखर (Sugar) - आवश्यकतेनुसार
दही - अर्धी वाटी
बेकिंग सोडा - अर्धा चमचा
2. कृती
1. रवा घेऊन त्यात मैदा, बेसनाचे पीठ, मीठ व साखर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
2. त्यानंतर त्यात दही (Curd) घालून एक कप पाणी घाला व १० मिनिटे झाकून ठेवा.
3. अर्धा तासानंतर बेकिंग सोडा २ चमचे पाण्यात घालून त्यात चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
4. आता गॅसवर पॅन ठेवा आणि गरम होऊ द्या. आता पाणी शिंपडा आणि डोसा (Dosa) पिठात पसरवा.
5. नंतर त्यावर तेल लावा आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
6.चटणी व सांबारसोबत सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.